Virat Kohli | "डोकेदुखी...", विराटने कॅप्टन्सी सोडल्यानंतर अश्विनची पहिली प्रतिक्रिया

 टीम इंडियाचा (Team India) आक्रमक फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20, वनडेनंतर कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला.   

Updated: Jan 16, 2022, 04:36 PM IST
Virat Kohli | "डोकेदुखी...", विराटने कॅप्टन्सी सोडल्यानंतर अश्विनची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) आक्रमक फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20, वनडेनंतर कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराटने तडकाफडी कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयानंतर क्रीडा विश्वासह एकच खळबळ उडाली. यानंतर अनेकांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर अश्विननेही (R Ashwin) विराटच्या या निर्णयाबाबत  ट्विट करत आपलं म्हणंन मांडलं आहे. अश्विनने विराटबाबत एकूण 3 ट्विट केले आहेत. (team india senior off spinner ravichandran ashwin give rection after virat kohli leave test captaincy) 

अश्विन काय म्हणाला? 

"कर्णधारांनी केलेले विक्रम आणि टीमला मिळवून दिलेल्या विजयासाठी वेळोवेळी त्यांचं नाव घेतलं जातं. पण तु टीमसाठी बेंचमार्क सेट केलंस,  त्यानंतर क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका आणि अन्य ठिकाणी मिळालेल्या विजयाबाबत चर्चा करतील. विजय हा फक्त त्या सामन्यापुरता असतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर जितकी कठोर मेहनत घेता, तेव्हा तुम्हाला त्याचा दुप्पटीने परतावा मिळतो. तु टीम इंडियाची एक सकारात्मक प्रतिमा तयार केली आहेस. त्यानंतर सर्वांच्याच आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. वेल डन विराट कोहली",  

नव्या कर्णधारासाठी डोकेदुखी

"तु यासह जो कोणी नव्याने कर्णधार होईल, त्यसााठी डोकेदुखी तयार केली आहे. कर्णधार म्हणून तुझ्याकडून खूप काही शिकलो आहे", अशा शब्दात अश्विनने विराटच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.