IND vs AUS: भारत पराभवाच्या छायेत असताना सूर्या आणि इशान मात्र स्वतःच्याच मस्तीत; व्हिडीओ व्हायरल!

कांगारूंची टीम जेव्हा जिंकण्याच्या उंबरठ्यावर होती, त्यावेळी कॅमेरा ड्रेसिंग रूममध्ये फिरवण्यात आला. यावेळी सूर्या आणि ईशान त्यांच्याच मस्तीमध्ये असल्याचं दिसून आले.

Updated: Mar 3, 2023, 06:49 PM IST
IND vs AUS: भारत पराभवाच्या छायेत असताना सूर्या आणि इशान मात्र स्वतःच्याच मस्तीत; व्हिडीओ व्हायरल! title=

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्ड-गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) सुरु असून शुक्रवारी तिसऱ्या सामन्याचा निकाल लागला. तिसऱ्या सामन्यात कांगारूंनी भारताचा 9 रन्सने पराभव केला. या सामन्याच्या पहिल्याच दिवसापासून टीम इंडिया काहीशी अडचणीत होती. अखेर सामन्याचा निकाल टीमच्या विरूद्ध गेला. अशातच टीम इंडिया (Team India) पराभवाच्या छायेत असताना टीमचे खेळाडू सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन मात्र आपल्याच मस्तीमध्ये असल्याचं दिसून आलं. 

सूर्या-ईशान आपल्याच मस्तीमध्ये

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये टीम इंडियाचा खेळ फारच वाईट झाल्याचा दिसून आला. टीम इंडियाच्या फलंदाजांना दोन्ही डावांमध्ये साजेसा खेळ करता आला नाही. अशातच सामन्यानंतर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून भारतीय चाहत्यांना मात्र थोडं वाईट वाटू शकतं. 

सूर्या आणि ईशानचा व्हिडीओ व्हायरल

सूर्यकुमार आणि ईशान तिसऱ्या टेस्टच्या प्लेईंग 11 मध्ये नव्हते. यावेळी कांगारूंची टीम जेव्हा जिंकण्याच्या उंबरठ्यावर होती, त्यावेळी कॅमेरा ड्रेसिंग रूममध्ये फिरवण्यात आला. यावेळी सूर्या आणि ईशान त्यांच्याच मस्तीमध्ये असल्याचं दिसून आले. त्याच्या या कृत्यानंतर या दोघांवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहते त्यांच्यावर टीका करतायत.

तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. (IND vs AUS 3rd Test) या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. (Test Cricket News) दरम्यान, चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2 -1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. या विजयामुळे चौथ्या कसोटीत चुसर निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कांगारुंसाठीही ही कसोटी मालिका 2 -2 अशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर टीम इंडिया चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. 

इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 76 धावांचे टार्गेट ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने केवळ एक गडी गमावून सहज गाठले. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया अपयशी ठरली आहे. रोहित टीमचे सर्व 'प्लानिंग' फोल ठरले चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.