T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी 20 वर्ल्डकप जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताच्या आजी माजी क्रिकेटपटूंनी जेतेपदावरून आपली मतं व्यक्त केली आहेत. सुनिल गावसकर यांच्या मते टीम इंडिया (Team India) अंतिम फेरीत पोहोचेल, तर कपिल देव यांनी सेमीफायनलमध्ये पोहोचेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली आहे. दुसरीकडे टीम इंडिया स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं टी 20 वर्ल्डकपबाबत (T20 World Cup) सिक्रेट सांगितलं आहे. यंदाचा वर्ल्डकप भारत विराट कोहलीच्या (Virat Kohli) जोरावर जिंकेल असं ऋषभ पंतनं (Rishabh Pant) सांगितलं आहे. विराट कोहलीकडे चांगला अनुभव असून प्रत्येक स्थितीत खेळू शकते. विराट कोहलीला आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतून पुन्हा सूर गवसला आहे. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
'विराट कोहलीकडे दडपणाची परिस्थिती हातळण्याची कसब आहे, हे त्याच्याकडून आम्हाला शिकायला मिळते. त्याचा अनुभव भविष्यातील क्रिकेट प्रवासात मदत करेल. त्याच्यासोबत फलंदाजी करताना त्याचा अनुभव कामी येतो. फलंदाजीसाठी भरपूर अनुभव असलेल्या खेळाडू सोबत असणे चांगले आहे कारण तो तुम्हाला कसं खेळायचं आणि प्रत्येक चेंडूवर एक धाव घेऊन दबाव कसा ठेवायचा हे तो सांगू शकतो.', असं ऋषभ पंतनं सांगितलं.
ऋषभ पंतनं पुढे सांगितलं की, 'जेव्हा तुम्ही मैदानात उतरता तेव्हा एक वेगळेच वातावरण असते आणि तुम्हाला लोक जल्लोष करताना दिसतात. जेव्हा आम्ही राष्ट्रगीत म्हणत असतो तेव्हा अंगावर शहारा येतो.'
टी 20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. या सामन्यातील प्लेईंग 11 मध्ये ऋषभ पंतला स्थान मिळेल की नाही निश्चित नाही. आजी माजी खेळाडूंनी तयार केलेल्या प्लेईंग 11 मध्ये पंतला काही जणांना जागा दिली आहे. तर काही जणांनी ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली आहे.