टीम इंडियाचा फायटर किंग परतणार मैदानावर!

युवराजने एक व्हिडीयो शेअर केला आहे.

Updated: Dec 8, 2021, 07:40 AM IST
टीम इंडियाचा फायटर किंग परतणार मैदानावर!

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी खेळाडू युवराज सिंह त्याच्या करियरची दुसरी इंनिग खेळण्यासाठी तयार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने तो पुन्हा एकदा मैदानावर दिसणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच आता त्याने युवराजने एक व्हिडीयो शेअर केला आहे. ज्या व्हिडीयोमध्ये युवराजच्या हातात बॅट दिसून येतेय.

युवराजच्या या नव्या व्हिडीयोमुळे चाहते मात्र फारच आनंदात आहेत. हा व्हिडीयो शेअर करताना युवराजने लिहिलंय की, ती वेळ आलीये..तुम्ही तयार आहात का? यासाठी तुमच्याकडे क्षमता आहे का? तुमच्या सर्वांसाठी एक मोठं सरप्राईज आहे...

या व्हिडीयोमध्ये बॅट आणि बॉलसोबत युवराज दिसून येतोय. याचसोबतच्या त्याच्या करियरशी निगडीत आठवणींना दाखवण्यात आलं आहे. तसंच युवराजने ठोकलेल्या त्या 6 सिक्सदरम्यान रवी शास्त्रींनी दिलेल्या कॉमेंट्रीचा देखील व्हिडीयोमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान सुमारे महिनाभरापूर्वी युवराज सिंगने मैदानात परतत असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेक तो खेळणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात होते. आता युवराजने याचा दुसरा भाग रिलीज केला आहे.

सोशल मीडियावर युवराज सिंगचा बोलबाला आहे. नुकताच युवीचा महेंद्रसिंग धोनीसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. दोन्ही दिग्गज खेळाडू बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले. हा फोटो पाहताच चाहते भावूक झाले.