WC Points Table: टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला मोठा फटका; पॉईंट्स टेबलमध्ये बाबर सेनेची घसरण

World Cup 2023 Points Table: अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) उत्तम खेळी करत शकत झळकावलं. टीम इंडियाच्या ( Team India ) या विजयामुळे वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 12, 2023, 08:32 AM IST
WC Points Table: टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला मोठा फटका; पॉईंट्स टेबलमध्ये बाबर सेनेची घसरण title=

World Cup 2023 Points Table: आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये ( ICC Cricket World Cup 2023 ) टीम इंडियाने सलग 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. बुधवारी अरूण जेटली स्टेडियमवर टीम इंडिया विरूद्ध अफगाणिस्तान ( IND vs AFG ) यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट्सने अफगाणिस्तानचा पराभव केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) उत्तम खेळी करत शकत झळकावलं. टीम इंडियाच्या ( Team India ) या विजयामुळे वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत.   

टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

बुधवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी अफगाणिस्तानने भारताला 273 रन्सचं टार्गेट दिलं. टीम इंडियाने या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 35 ओव्हर्समध्ये हे आव्हान पूर्ण करत विजय मिळवला. या विजयानंतर वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीये. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्डतर 2023 ला धमाकेदार सुरुवात केलीये. या स्पर्धेत भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांची आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी पहायला मिळाली आहे. यामुळे टीमने आयसीसी वनडे वर्ल्डतप 203 च्या पॉईंट्स टेबलमध्ये आपलं स्थान मजबूत केलंय.

दोन बॅक टू बॅक विजयानंतर भारत पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यावेळी टीम इंडियाचं नेट रन रेट +1.500 असं आहे. तर सलग दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानची टीम दहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ टीम-1 वर आहे. न्यूझीलंडच्या टीमचं नेट रन रेट +1.958 इतकं आहे. 

टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला मोठा फटका

अफगाणिस्तानविरूद्ध विजय मिळवत टीम इंडियाने पॉईंट्स टेबलच्या दुसऱ्या स्थानी झेप घेतलीये. याचा फटका पाकिस्तानच्या टीमला बसला आहे. यामुळे भारताने पाकिस्तानला तिसऱ्या स्थानावर ढकललंय. भारत आणि पाकिस्तानचे सध्या प्रत्येकी चार गुण आहेत पण रोहित सेनेचं नेट रनरेट चांगलं आहे. यापूर्वी पाकिस्तानची टीम दुसऱ्या क्रमांकावर होती. 

टीम इंडियाचा पुढचा सामना पाकिस्तानविरूद्ध

टीम इंडियाला आता 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत तिसरा सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारतीय टीमने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत केल्यास उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात. कारण पाकिस्तान संघाला अजूनही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या मोठ्या संघांसोबत सामने खेळायचे आहेत.