जोहान्सबर्ग : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये सुरु आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात फिटनेसमुळे कर्णधार विराट कोहली टीमबाहेर आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा के.एल राहुलवर सोपवण्यात आलीये. तर सामन्यादरम्यान के.एल राहुल चर्चेत आला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी बाचाबाची करत असताना व्हिडीयो व्हायरल झाला आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात के.एल राहुल आऊट झाल्यानंतर त्याची दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी बाचाबाची झालेली दिसली. सातव्या ओव्हरमध्ये जॅनसनच्या गोलंदाजीवर राहुलच्या बॅटची एज लागली. यावेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या एडन मर्करमने कॅच घेतला. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. मात्र के.एल राहुल क्रिजवरच उभा होता.
राहुलने थर्ड अंपायरकडे विकेटची मागणी केली. थर्ड अंपायरने सतत रिप्ले पाहून देखील कोणता ठोस निर्णय सापडत नव्हता. यामुळे सॉफ्ट सिग्नलच्या आधारावर के.एल राहुलला आऊट करार देण्यात आला.
आऊट दिल्यानंतरही राहुल क्रिजवर उभा होता आणि याचवेळी त्याची आफ्रिकी फिल्डर्ससोबत बाचाबाची झाली. पवेलियनमध्ये जाताना देखील के.एल राहुल मागे वळून खेळाडूंना काहीतरी बोलत होता.
Rahul and Elgar have an exchange. Not a pleasant one by the looks of it #INDvSA pic.twitter.com/whSm16T8gv
— Benaam Baadshah (@BenaamBaadshah4) January 4, 2022
जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया 202 वर ऑलआऊट झाली. यानंतर दक्षिण आफ्रिकने 229 रन्स केले. भारताकडू शार्दूल ठाकूरने एकाच डावात 7 विकेट्स घेत रेकॉर्ड नोंदवला आहे.