गेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष'

सध्या देशातील क्रिकेटप्रेमी आयपीएलमध्ये दंग आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळते आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच कायम आहे. पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यामध्येही असंच काही पाहायला मिळालं.

शैलेश मुसळे | Updated: Apr 25, 2018, 01:15 PM IST
गेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष' title=

मुंबई : सध्या देशातील क्रिकेटप्रेमी आयपीएलमध्ये दंग आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळते आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच कायम आहे. पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यामध्येही असंच काही पाहायला मिळालं.

गेलकडे दुर्लक्ष

हा सामना पंजाबने 15 रनने जिंकला. पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला गेल. गेलने शानदार बॅटींग करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. गेलला कोणत्याच टीमने घेण्याची तयारी नाही दाखवली पण सेहवागने त्याला पंजाबमध्ये घेतलं.

गेलची बॅटींग पडली फिकी

गेलने जबरदस्त बॅटींग करत बॉलर्सना बॉल कुठे टाकावा हा विचार करायला मजबूर केलं. पण मैदानात गेलची बॅटींग एका तरुणीपुढे फिकी पडली. कारण मैदानात एक चेहरा असा होता जिच्यावर सारखा कॅमेरा झूम होत होता. 

कोण होती ती?

मैदानात सगळ्यांनाच आपल्याकडे आकर्षित करणारी ती तरुणी होती दक्षिणातील अभिनेत्री पूनम कौर. तिची सुंदरता पाहून मैदानातील प्रेक्षक देखील तिच्याकडे पाहत होते. पूनम नेहमी आयपीएल सामन्यांमध्ये दिसते.