Ind vs Sa 3 T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यामध्ये आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांसोबत 'गरबा' खेळला आहे. रिली रूसोचं वादळी शतक आणि डिकॉकची 68 धावांची खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 227 धावा चोपल्या. अर्धशतकी खेळी करणाऱ्या डिकॉकने मोठा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. (Trending Ind vs Sa 3rd T20 DeKock first player to do such a performance against Team India)
मागील सामन्यातील शतकवीर डेव्हिड मिलरसोबत आफ्रिकेला विजयाच्या जवळ आणणाऱ्या डिकॉकने अर्धशतकी खेळी केली होती. क्विंटन डिकॉकने मागच्या आणि आताच्या सामन्यातील अर्धशतकासह एकूण 4 अर्धशतक भारताविरोधात केली आहेत. भारताविरूद्ध सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज बनला आहे. वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनेही 4 अर्धशतके केली आहेत.
भारताविरूद्ध टी-20 मध्ये 300 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. डिकॉकने आणखी एक पराक्रम केला आहे. तो म्हणजे आफ्रिकेसाठी 2000 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू झाला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20 सामना (IND vs SA 3rd T20) झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळल्या (IND vs SA 3rd T20) जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेत भारतीय खेळाडू जबरदस्त कामगिरी करत होते. मात्र, अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा 49 धावांनी पराभव झाला आहे. मात्र टीम इंडियाने आधीच 2-0 ने मालिका खिशात घातली आहे.