प्रायव्हेट जेट, कुटुंब आणि प्रशिक्षण; आशिया कपपूर्वी हार्दिकचा 'A day in my life' व्हिडीओ...

हार्दिक पंड्याने लग्झरी लाइफचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर त्याचा या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. 

Updated: Aug 24, 2022, 06:55 PM IST
प्रायव्हेट जेट, कुटुंब आणि प्रशिक्षण; आशिया कपपूर्वी हार्दिकचा 'A day in my life' व्हिडीओ... title=
trending video hardik pandya lifestyle activities in his entire day video on social media Viral

Hardik Pandya Video: येत्या रविवार भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी खास दिवस असणार आहे. कारण भारत आपल्या शूत्र असलेला पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आशिया कप 2022चं काउंट डाउन सुरु झालं आहे. कारण येत्या शनिवारपासून आशिया कप सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी इंडियन टीमने कंबर कसली आहे. 

आशिया कप 2022  सोबत एका क्रिकेट खेळाडूनची जोरदार चर्चा सुरु आहे. भारताचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) कायम च्या लुक्स आणि हेअरस्टाइलमुळे चर्चेत असतो. कायम नवीन नवीन लुक करुन त्याने क्रिकेटप्रेमींसोबत सोशल मीडियावर अनेक यूजर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. (trending video hardik pandya lifestyle activities in his entire day video on social media Viral)

हार्दिक पंड्याच्या खेळाचे जेवढं चाहते आहेत तेवढंच सोशल मीडियावर त्याचा लूक आणि लाइफस्टाइलचे चाहते आहेत. हार्दिक पंड्याने लग्झरी लाइफचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर त्याचा या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. 

क्या बात है पंड्या!

त्याने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली, जिथे त्याने आपला संपूर्ण दिवस कसा जातो हे दाखवले आहे. पंड्याची शैली नेहमीच चर्चेत असते. या व्हिडिओमध्ये भारताचा स्टार ऑलराऊंडर त्याच्या प्रायव्हेट जेटमधून प्रवास करताना दिसत आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातूनही तो आई, पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाही. व्हिडिओमध्ये पंड्या मुलांसोबत खेळताना आणि सराव सत्रात घाम गाळताना दिसत आहे.