Under 19 WC : भारत पाचव्यांदा विश्वविजेता होण्यासाठी सज्ज! भारत लगावणार विजयाचा पंच

आज इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पुन्हा वर्ल्डकपवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करेल. 

Updated: Feb 5, 2022, 08:46 AM IST
Under 19 WC : भारत पाचव्यांदा विश्वविजेता होण्यासाठी सज्ज! भारत लगावणार विजयाचा पंच title=

मुंबई : टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फायनलमध्ये टीम इंडियाची लढत इंग्लंडशी होणार आहे. चार विजेतेपद पटकावणारी टीम इंडिया अंडर-19 वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. आज इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पुन्हा वर्ल्डकपवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करेल. 

टीम इंडियासह प्रत्येक भारतीयाच्या नजरा विक्रमी पाचव्या विजेतेपदावर आहेत. भारताने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावलं आहे. त्याचबरोबर इंग्लंडने 1998 साली एकमेव विजेतेपद पटकावलं होतं.

मुख्य म्हणजे कोरोना संसर्गाशी झुंज देत असतानाही टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली. वर्ल्डकपच्या सुरुवातीला टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 174 धावांनी पराभव केला.

टीम इंडियाची विजयी मालिका सुरुच राहिली. तिसऱ्या सामन्यात युगांडाचा 326 धावांनी पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा 5 गडी राखून तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव केला. दरम्यान भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी अंडर 19 वर्ल्डकपच्या 2022 स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. 

अंडर-19 वर्ल्ड कप फायनलसाठी टीम इंडियाचं प्लेईंग 11

अंगकृष रघुवंशी, हरनूर सिंह, शेख रशीद, यश धुल (कर्णधार), निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना (विकेटकीपर), राजवर्धन हंगरगेकर, विक्की ओस्तवाल, रवि कुमार