नागपूर : भारताचा फास्ट बॉलर उमेश यादवला आरबीआयमध्ये नोकरी लागली आहे. सोमवारपासून उमेश यादव नागपूरच्या कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापक पदावर रुजू होणार आहे. स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत उमेश यादवला आरबीआयमध्ये नोकरी लागली आहे.
आरबीआयनं उमेशला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधीच नोकरीवर रुजू व्हायला सांगितलं होतं, पण लगेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला जायला लागल्यामुळे उमेशनं तेव्हा रुजू व्हायचं टाळलं होतं. सोमवारी आरबीआयमध्ये रुजू झाल्यावर थोड्याच दिवसांमध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होईल.
याआधी उमेश यादवनं एअर इंडियामध्ये कंत्राटी नोकरी केली होती. त्यावेळी एअर इंडियानं त्याला नोकरीमध्ये कायम ठेवले नव्हते. तसंच दहा वर्षांआधी वडिलांच्या आग्रहास्तव उमेश यादवनं पोलीस भरतीची परीक्षाही दिली होती. पण फक्त काही मार्क कमी पडल्यामुळे उमेश यादवला पोलीस खात्यात दाखल होता आलं नाही.