"ही गोष्ट लपवून मी तुझी लाज राखली", उर्वशीने पुन्हा साधला ऋषभ पंतवर निशाणा!

 ऋषभ पंतची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा खेळाबद्दल नसून बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रंगलेल्या शाब्दिक चकमकीबाबत आहे. 

Updated: Aug 26, 2022, 07:34 PM IST
"ही गोष्ट लपवून मी तुझी लाज राखली", उर्वशीने पुन्हा साधला ऋषभ पंतवर निशाणा! title=

Rishabh Pant Urvashi Rautela: भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत मैदानातील आक्रमक खेळीमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. भारतीय क्रीडाप्रेमींना येत्या आशिया कपमध्ये त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र असं असताना ऋषभ पंतची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा खेळाबद्दल नसून बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रंगलेल्या शाब्दिक चकमकीबाबत आहे. ऋषभ पंतच नाव बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हीच्यासोबत त्याचं नाव जोडलं जात आहे. आता उर्वशीने एक फोटो पोस्ट केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे नेटकरी ऋषभ पंतला टार्गेट करत आहेत. उर्वशीने एक ग्लॅमरस व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, "मी माझी साइड स्टोरी न सांगून तुझी लाज राखली आहे." या कॅप्शनद्वारे उर्वशीने पुन्हा एकदा ऋषभ पंतवर निशाणा साधल्याचे लोकांचे मत आहे.

यापूर्वी उर्वशी रौतेलाच्या वक्तव्यानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर आपला राग काढला होता. ऋषभ पंतने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक मेसेज लिहिला, 'काही लोक फक्त गंमत म्हणून मुलाखतीत खोटे बोलतात, जेणेकरून चर्चा होईल आणि बातम्यांमध्ये राहता येईल. लोक प्रसिद्धीसाठी इतके भुकेले कसे असतात, हे जाणून दु:ख होतं.' ऋषभ पंतने उर्वशी रौतेलाची खिल्ली उडवत आणि लिहिले होते की, 'बहिणी माझी पाठ सोड, खोटं बोलण्याच्याही काही मर्यादा असतात.'

2019 मध्ये फॉर्म गवसत नसल्याने ऋषभ पंतने उर्वशी रौतेलाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले होते, अशी चर्चा होती. ऋषभ पंत सध्या ईशा नेगीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ईशा मूळची डेहराडूनची असून ती इंटिरियर डिझायनर आहे. ईशा नेगी इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते.