IND VS SL U19 Asia Cup : सध्या यूएईमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 एशिया कप 2024 (ACC U19 Asia Cup 2024) स्पर्धेत ६ डिसेंबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात यांच्यात स्पर्धेचा सेमी फायनल सामना पार पडला. शारजाह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताकडून 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने सलग दुसऱ्यांदा वादळी खेळी केली. यासह टीम इंडिया आता थेट अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 (IPL 2025) साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये बिहारचा 13 वर्षीय क्रिकेटरवर कोट्यवधींची बोली लागली होती. यात राजस्थानने 1.10 कोटींची बोली लावून त्याला विकत घेतले होते.
4 डिसेंबर रोजी यूएईला पराभूत करून टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक दिली होती. त्यामुळे भारत हा पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या संघांसोबत सोबत सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झाला होता. आशिया कपचा पहिला सेमी फायनल सामना 6 डिसेंबर रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तर दुसरा सेमी फायनल सामना हा भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार होता. त्याप्रमाणे शारजाह स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंडर 19 एशिया कप 2024 चा सेमी फायनल सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
हेही वाचा : बर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेव
भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 47 ओव्हरमध्ये 173 धावांवर ऑल आउट केले. शरुजन षण्मुगनाथन (42), लकविन अबेसिंघे (69), कविजा गमागे (10), विहास थेवमिका (14) इत्यादी वगळता इतर कोणताही फलंदाज दोन अंकी धावसंख्या करू शकला नाही. भारताकडून गोलंदाज चेतन शर्माने 3, किरण चोरमाले, आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी 2 तर हार्दिक राज आणि युधाजित गुहा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेने 174 धावांचं आव्हान दिलं होतं. विजयाचे आव्हान पूर्ण करताना भारतीय फलंदाज आयुष म्हात्रेने 34, आंद्रे सिद्धार्थने 22, मोहमेद अमानने 25, केपी कार्तिकेयने 11 तर वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक 67 धावांची कामगिरी केली. वैभव सूर्यवंशीने 36 बॉलमध्ये 67 धावा केल्या तर या दरम्यान 5 षटकार आणि 6 चौकार लगावले. टीम इंडियाने तब्बल 5 विकेट्स राखून 22 ओव्हरमध्ये 175 धावा करून सामना जिंकला. त्यामुळे आता भारताने थेट फायनलमध्ये धडक दिली असून रविवार 8 डिसेंबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सेमी फायनल सामना होईल.
आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचे वय 13 वर्षे असून त्याचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला. वैभव सूर्यवंशी या ऑल राउंडर खेळाडूने बिहारसाठी पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन चार दिवसीय रेड-बॉल क्रिकेट सामने खेळणाऱ्या भारताच्या अंडर-19 संघाचा वैभव देखील भाग होता. यावेळी त्याने शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वैभवने आतपर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5 सामने खेळून 100 धावा केल्या असून गोलंदाजी करताना 1 विकेट सुद्धा मिळवली आहे. वैभव सूर्यवंशीने मेगा ऑक्शनमध्ये त्याचं नाव 30 लाखांच्या बेस प्राईजवर नोंदवल होतं. हा युवा खेळाडू जेव्हा ऑक्शनमध्ये आला तेव्हा त्या खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारून वैभव सूर्यवंशीवर 1.10 कोटींची बोली लावून त्याला खरेदी केले. त्यामुळे वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमधील सर्वात तरुण करोडपती खेळाडू ठरला आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.