IPL 2025 : तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा क्रिकेटर होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंचं शिक्षण मागे पडतं. रोहित शर्मा आणि विराट सारखे भारतातील अनेक दिग्गज खेळाडू देखील फक्त 10 वी किंवा 12 वी पास आहेत. तेव्हा तुम्हाला अशा क्रिकेटर विषयी सांगणार आहोत जो फक्त पदवी आणि पदवीउत्तरच शिक्षण नाही तर सध्या पीएचडी देखील पूर्ण करत आहे.
आयपीएल 2025 साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये भारतीय खेळाडूंवर विक्रमी बोली लावण्यात आली. सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये ऋषभ पंत (27 कोटी), व्यंकटेश अय्यर (26.75 कोटी) आणि व्यंकटेश अय्यर (23.75 कोटी) इत्यादींचा समावेश होता. कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरवर 23. 75 कोटींची बोली लावली आणि त्याला आपल्या संघाशी जोडले. अय्यर हा यापूर्वी देखील केकेआरचा भाग होता, मात्र ऑक्शनपूर्वी त्याला संघाने रिटेन केलं नव्हतं. मीडिया रिपोर्टनुसार व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) हा केकेआरचा कर्णधार सुद्धा होऊ शकतो. दरम्यान व्यंकटेश अय्यरने एका मुलाखती दरम्यान सांगितले की तो पीएचडीचा अभ्यास करत असून लवकरच त्याच्या नावासमोर डॉक्टर ही पदवी लागणार आहे.
हेही वाचा : दुसरी मॅच गमावल्यावर WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताची घसरण, WTC Final मध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?
ऑल राउंडर खेळाडू व्यंकटेश अय्यर याने एक्सप्रेस स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं की, 'मी सध्या फायनान्समध्ये PhD करत आहे. तुम्ही पुढल्यावेळी माझी मुलाखत डॉ. व्यंकटेश अय्यर म्हणून घ्याल. शिक्षण हे तुमच्या सोबत नेहमी राहते. क्रिकेटर 60 वर्षांपर्यंत खेळू शकत नाही. तुम्ही सुशिक्षित असल्याने तुम्हाला तुम्हाला योग्य निर्णय घेण्यातही मदत होते'.
DR. VENKATESH IYER Venky said, I 39 m pursuing my PhD in finance. You be interviewing me as Dr. Venkatesh Iyer next time. Education stays with you forever, a cricketer cannot play till 60. Being educated helps you in your decisions as well. (Express Sports). pic.twitter.com/7utlqt59Jp
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) December 9, 2024
हेही वाचा : अॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेना
व्यंकटेश अय्यर याने भारतीय संघाकडून खेळताना आतापर्यंत 9 टी 20 आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. यात टी 20 मध्ये अय्यरने 133 धावा केल्या तर वनडेमध्ये 24 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये आतापर्यंत व्यंकटेश अय्यरने 50 सामने खेळले असून यात त्याने 1326 धावा केल्या. तर आयपीएलमध्ये 3 विकेट्स देखील घेतल्या आहेत. भारताकडून टी 20 मध्ये गोलंदाजी करताना त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत.