मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरवर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन केलं आहे. हा वाद संपत नाही तोच वॉर्नर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वॉर्नरच्या बायकोच्या भावानं एका गाडीच्या काचांची तोडफोड केली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या परिवाराचा एक जण पाठलाग करत होता. म्हणून केंडाईस वॉर्नरचा भाऊ टिम फलजोन भडकला आणि त्यानं पाठलाग करणाऱ्याच्या गाडीच्या काचा फोडल्या.
The brother-in-law of disgraced cricketer David Warner has been charged over an attack on a photographer's car. #7News pic.twitter.com/LypGFs8wrJ
— 7 News Melbourne (@7NewsMelbourne) April 22, 2018
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली आहे. स्मिथ आणि वॉर्नरच वर्षभरासाठी तर बँक्रॉफ्टचं नऊ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं. याप्रकरणामध्ये वॉर्नर हा प्रमुख सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे तो आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होऊ शकणार नाही.
बंदी घालण्यात आल्यानंतर डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वॉर्नर एका इमारतीचं बांधकाम करत असल्याचं दिसत आहे.
After ball-tampering ban, @davidwarner31 working on the building site of his under-construction mansion, located in the beachside Sydney suburb of Maroubra.#DavidWarner pic.twitter.com/TnZhHJYWTQ
— Umair Sohail (@umsaleemi) April 20, 2018
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बंदी घातल्यामुळे स्मिथ आणि वॉर्नरचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केलेल्या करारानुसार स्मिथला वर्षाला २ मिलियन आणि वॉर्नरला १.४ मिलियन डॉलर मिळणार होते. तसंच या बंदीमुळे वॉर्नर आणि स्मिथ आयपीएलही खेळू शकले नाहीत. त्यामुळे या सगळ्या पैशांवर त्यांना पाणी सोडावं लागलं आहे. या तिन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियातलं घरगुती क्रिकेट खेळायची परवानगी नसली तरी ते क्लब क्रिकेट खेळू शकतात, असं स्पष्टीकरण क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केलं आहे.