मुंबई : आयपीएलमध्ये चार पराभवानंतर पुन्हा एकदा मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे. वानखेडेवर मंगळवारी मुंबईचा सामना हैदराबादशी होणार आहे. मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघांना गेल्या लढतीत पराभवाचं तोंड पहावं लागलय. यामुळे या लढतीत दोन्ही संघांसमोर कमबॅकचं आव्हान असेल. आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपदाला गवसणी घातलेल्या मुंबई संघाची कामगिरी या हंगमात चांगली होत नाहीय. मुंबई संघानं आतपर्यंत खेळलेल्या पाच लढतींमधील चार लढतींमध्ये पराभव पत्करावा लागलाय. यामुळे मुंबई संघावर क्रिकेट चाहते नाराज आहेत. गेल्या लढतीतही मुंबईला राजस्थानकडून पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं.
पहिल्या लढतीत ज्या हैद्राबाद संघाकडून मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. त्या हैद्राबादविरुद्ध मुंबई पुन्हा भिडणार आहे. आताचा सामना हा मुंबईच्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर आहे. याचा थोडाफार दिलासा मुंबई संघाला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आतापर्यंत एकच धमाकेदार खेळी करु शकलाय. गेल्या लढतीत तर रोहित खातंही उघडू शकलेला नाही.
दरम्यान वानखेडेवर पुन्हा एकदा रोहितची बॅट चालेल अशी आशा मुंबईच्या क्रिकेट चाहत्यांना वाटतेय. याखेरीज गेल्या लढतीत अर्धशतक झळकावणारे सुर्युकमार यादव आणि ईशान किशनकडूनही तशाच खेळीच अपेक्षा असून ईविन लेविसकडूनही आशा असतील. पंड्या बंधू पुन्हा एकदा चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतील. तर मुंबईकडून सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या मयांक मरकंडे या लेगस्पिनरनं आपल्या कामगिरीनं सा-यांचं लक्ष वेधून घेतलय.
तर दुसरीकडे गेल्या लढतीत मुंबईला पराभवाची धुळ चारल्यानं हैदराबादचा संघ आत्मविश्वसानंच या लढतीत उतरेल. हैद्राबाद संघानं आतापर्यंत खेळलेल्या पाच लढतींपैकी तीन लढती जिंकल्या आहेत. दरम्यान गेल्या लढतीत हैद्राबादलाही पराभवाचं तोंड पहावं लागलाय.
हैद्राबादचा कर्णधार केन विलियमसन त्यांच्या संघासाठी मोठा आधारस्तंभ ठरलाय. याखेरीज शिखऱ धवन, युसूफ पठाण यांच्यावर फलंदाजी मदार असेल. तर भुनवेश्वर कुमार हैदराबादच्या गोलंदाजीचं नेतृत्त्व करेल. आता मुंबईला घरच्या मैदानावर विजय साकारावाच लागेल. अन्यथा मुंबईचा आगामी प्रवास अधिखच खडतर होईल.