Neeraj Chopra Video : नीरज चोप्राचं आणखी एक टॅलेंट समोर, व्हिडीओ व्हायरल

सगळीकडेच नीरज चोप्राच्याच नावाची चर्चा 

Updated: Aug 12, 2021, 11:06 AM IST
Neeraj Chopra Video : नीरज चोप्राचं आणखी एक टॅलेंट समोर, व्हिडीओ व्हायरल  title=

मुंबई : नीरज चोप्राने टोक्यो ऑल्मपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून संपूर्ण देशाला आनंद दिला. सोशल मीडियावर सगळीकडेच नीरज चोप्राच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर आता नीरजचे अनेक जुने व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच दरम्यान त्याचा डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नीरजने चक्क दलेर मेहंदीच्या गाण्यावर डान्स केलाय.  

नीरज चोप्रा या व्हिडीओत दलेर मेहंदी यांच्या गाण्यावर नाचत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नीरज चोप्राचा हा जुना डान्स व्हिडीओ आहे. यामध्ये तो अगदी मस्त नाचत आहे. काहींनी तर या व्हिडीओला देसी छोरा..बेस्ट बाराती डान्सर... अशी कमेंट पोस्ट केली आहे.

ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नीरज चोप्राचा हा जुना डान्स व्हिडीओ आहे. यामध्ये तो अगदी मस्त नाचत आहे. काहींनी तर या व्हिडीओला देसी छोरा..बेस्ट बाराती डान्सर... अशी कमेंट पोस्ट केली आहे. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा सध्याचा सर्वोत्कृष्ट भालाफेक करणारा जगातील दुसरा पुरुष ठरला आहे

. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणारा नीरज 1315 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता, केवळ 1396 गुणांसह रँकिंगमध्ये आघाडीवर असलेला जर्मनीचा जोहान्स व्हेटरच्या मागे होता. पोलंडचा मार्सिन क्रुकोव्स्की (तीन), झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेजच (चार) आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर (पाच) क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये पूर्ण झाले. नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत 87.58 मीटरच्या अंतरावर भाला फेकून एथलेटिक्समध्ये भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले. नीरजच्या या प्रयत्नामुळे भारताला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक सात पदकांची संख्या मिळवून देण्यात हातभार लागला.