IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामना न खेळताही संजू सॅमसन बनला हिरो; 'हा' Video नक्की पाहा

IND vs NZ : संजू सॅमसनला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये स्थान देण्यात आले नाही. तसेच तिसऱ्या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्येही त्याला संधी देण्यात आली नाही

Updated: Nov 23, 2022, 03:22 PM IST
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामना न खेळताही संजू सॅमसन बनला हिरो; 'हा' Video नक्की पाहा title=

IND vs NZ 3rd T20 : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-0 ने आपल्या नावावर केली आहे. या मालिकेतील दोन सामने पावसामुळे वाया गेले, तर एक सामना भारताने जिंकला. कर्णधार हार्दिक पंड्याच्या  (Hardik Pandya) नेतृत्वाखाली  भारतीय संघाने (Team India) ही मालिका जिंकली आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. तसेच पुन्हा एकदा संघ निवडीवरुन चाहत्यांकडून टीका केली जात आहे.

युवा खेळाडू उमरान मलिक (umran malik) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांना संधी न दिल्याबद्दल जोरदार टीका केली जात आहे. संजूबाबत चाहत्यांच्या अनेक संतप्त प्रतिक्रियाही सोशल मीडियावर (Social Media) सातत्याने पाहायला मिळत आहेत. या मालिकेदरम्यान संजू सॅमसनला प्लेइंग 11मध्ये स्थान मिळेल, असे मानले जात होते, पण तसे झाले नाही. सॅमसन प्लेइंग इलेव्हनचा (Playing 11) भाग नसला तरी त्याची फॅन फॉलोइंग पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. राजस्थान रॉयल्सने (rajasthan royals) 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चाहते संजू... संजू... असे ओरडत आहेत.

सामन्यानंतर संजू सॅमसनने त्याच्या चाहत्यांकडे जात त्यांच्यासोबत फोटो क्लिक केला. तसेच त्यांच्या शुभेच्छा देखील स्विकारल्या. 

संजूच्या निवडीबाबत हार्दिकचे स्पष्टीकरण

सॅमसनला संधी न मिळाल्याबद्दल कर्णधार हार्दिक पंड्यानेही भाष्य केले आहे. अजून बराच वेळ आहे आणि सर्वांना संधी मिळेल आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना खूप मोठी संधी मिळेल, असे हार्दिकने म्हटले आहे. तसेच संजूच्या जागी असणे खूप अवघड आहे आणि मी स्वतःला त्याच्या जागी असण्याचाही विचार करू शकतो. मात्र दुर्दैवाने विविध कारणांमुळे त्याला स्थान मिळू शकले नाही, असेही हार्दिक म्हणाला.

त्याला वाईट वाटले तर तो माझ्याशी बोलू शकतो - हार्दिक पंड्या

"अशा बाबतीत खेळाडूंना उत्तर द्यायला मी  किंवा खुद्द प्रशिक्षक नेहमीच तयार असतो. कोणाला काही चुकीचे वाटले तर ते स्वतः माझ्याशी पुढे येऊन बोलू शकतात. मी त्यांच्या भावना समजू शकतो. संजू सॅमसनला स्थान न मिळणे दुर्दैवी आहे. आम्हाला त्याला खेळवायचे होते पण काही धोरणात्मक कारणांमुळे तो खेळू शकला नाही. त्याच्या जागी आणखी कोणीही असते तरीही मी समजू शकलो असतो. पण हे करावे लागतेच आणि त्याबद्दल मी त्यांच्याशी बोलायला नेहमीच तयार आहे. जर त्याला वाईट वाटत असेल तर तो माझ्याशी किंवा प्रशिक्षकाशी बोलू शकतो. मात्र मी कर्णधारपदी राहिलो तरी या बाबतीत माझा हा विचार कायम असेल," असेही हार्दिकने म्हटले आहे.