व्हिडिओ : ज्या रेसलरनं धू धू धुतलं, तिच्यासोबतच राखीचा डान्स VIRAL

CWE रेसलिंगमध्ये ड्रामा क्वीन राखी सावंत आणि परदेशी रेसलर रेबेलची मैत्री आणि खुन्नस... 

Updated: Nov 17, 2018, 11:24 AM IST
व्हिडिओ : ज्या रेसलरनं धू धू धुतलं, तिच्यासोबतच राखीचा डान्स VIRAL

नवी दिल्ली : भारतीय रेसलर 'द ग्रेट खली'नं हरियाणाच्या करनालमध्ये CWE रेसलिंगचं आयोजन केलंय. या रेसलिंग इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी देश-परदेशातून अनेक रेसलर्स दाखल झालेत. पण हा इव्हेंट चर्चेत आला तो ड्रामा क्वीन राखी सावंतमुळे... एका परदेशी रेसलर महिलेनं राखी सावंतला स्टेजवर धोबीपछाड दिली... आणि हॉस्पीटलमध्ये धाडलं... यानंतर राखीनं हा आपल्याविरुद्ध कट असल्याचं म्हटलं होतं... आता मात्र रुग्णालयातून बाहेर पडलेली राखी पुन्हा एकदा त्याच रेसलर महिलेसोबत नाचताना दिसली... आणि पुन्हा एकदा या रेसलर महिलेला राखी सावंतनं आणखी एक आव्हान दिलंय. 

अधिक वाचा :- राखी सावंतनंतर आता अर्शी खानही रेसलिंग रिंगमध्ये...पाहा व्हिडिओ

राखी सावंत अजूनही रागानं धुमसतेय... 

रुग्णालयातून बाहेर पडलेली राखी सावंत पुन्हा एकदा रेबेल आणि खलीसोबत एका रोड शोमध्ये सहभागी झाली. राखी सावंतनं या रोड शो दरम्यान पुन्हा रेबेल हिला रेसलिंगसाठी आव्हान दिलंय. राखीनं कॅमेऱ्यासमोर पुन्हा एकदा रेबेलला रिंगमध्ये लढण्याचं आव्हान दिलंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@thekatieforbes @rakhisawant2511 @rebeltanea

A post shared by The Great Khali (@dalipsinghcwe) on

यावेळी, राखीनं पुन्हा एकदा आपला राग व्यक्त केलाय. आता मात्र मी रेबेल हिला सोडणार नाही... पुन्हा एकदा तिच्यासोबत रिंगमध्ये फाईट करेल...आणि तिचा सामना करेन... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Great Khali (@dalipsinghcwe) on

तर पुढच्याच काही तासांत रोड शो दरम्यान राखी सावंत परदेशी रेसलर रेबेल हिच्यासोबत डान्स करताना दिसली. द ग्रेट खलीनं रोड शोचा हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केलाय. 

या व्हिडिओवरून रेबेलची आणि राखीची मैत्री झालेली दिसतेय.. पण राखीनं मात्र रेबेल हिला लढण्याचं आव्हानही दिलंय. 

 

अधिक वाचा :- परदेशी महिला कुस्तीपटूने आदळल्यानंतर राखी सावंत म्हणते...

 

... आणि राखी सावंत हॉस्पीटलमध्ये

काही दिवसांपूर्वी राखी सावंतनं रेसलिंगमध्ये रेबेल हिला आव्हान दिलं... त्यानंतर तिला हॉस्पीटलला जावं लागलं होतं. पंचकूलाच्या ताऊ देवी लाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सीडब्ल्यूईच्या बॅनरखाली आयोजन करण्यात आलंय. या इव्हेंटचं प्रमोशन राखी सावंत आणि अर्शी खानने केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Finally koi to accha kaam kiya #rakhisawant #wrestling #hospitalized

A post shared by Memes Shop (@memes__shop) on

यावेळी, राखीने अनेक वेळा  त्या विदेशी महिलेला चिडवून दाखवलं. नाराज झालेल्या विदेशी रेसलरने राखीला उचलून उचलून आपटायला सुरूवात केली. तिने राखीला एवढं मारलं की राखी सावंत दुखापतीमुळे विव्हळायला लागली. राखीला लागलेला मार इतका जबर होता की तिला सरळ चालताही येत नव्हत. यानंतर राखीला हॉस्पीटलला नेण्यात आलं.