विराटच्या अकाऊंटला इंस्टग्रामकडून खास पुरस्कार...

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची काही कमी नाही.

Updated: Mar 20, 2018, 03:05 PM IST
विराटच्या अकाऊंटला इंस्टग्रामकडून खास पुरस्कार... title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची काही कमी नाही. मात्र अनुष्कासोबत लग्न झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोजची चांगलीच चर्चा असते.

इंस्टाग्रामकडून अवॉर्ड

इंस्टाग्रामने पहिल्यांदाच एका अवॉर्डची घोषणा केली आहे. त्यात विराट कोहलीच्या अकाऊंटला मोस्ट एगेज्ड अकाऊंट हा पुरस्कार मिळाला आहे. कोहलीच्या इंस्टाग्राम अकाऊंटला १९.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. २०१७ मध्ये या अकाऊंटला इंगेज्मेंट अधिक होती.

रोमांटिक फोटो

विराट कोहलीने दक्षिण आफ्रीकेतून अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होती. हा रोमांटिक फोटो शेअर करताना विराटने लिहिले, माझी आणि फक्त माझी. (My one and only!). विराटच्या या फोटोत या दोघांचाही चेहरा दिसत नाहीये. 

A romantic pic shared on Social Media

विराटसाठी लेडी लक

११ डिसेंबरला बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाहबद्ध झाला. त्यावेळेस याची माहिती त्याने ट्वीट करुन दिली. त्यास सर्वात अधिक रिट्वीटस मिळाले. अनुष्काच्या या ट्वीटला गोल्डन ट्वीट ऑफ द ईयर बनवले गेले.विराट कोहली अनुष्काला लेडी लक समजतो. याची कबुली त्याने अनेक मुलाखतींमध्ये दिली आहे. 

Golden Tweet of the year

तेव्हापासून एकत्र फोटो शेअर करण्यास सुरूवात

अनेक वर्ष एकमेकांसोबत असूनही त्यांनी कधी आपल्या नात्याची उघडपणे कबुली दिली नाही. मात्र २०१७ मध्ये विराटने अनुष्कासोबत फोटो शेअर करण्यास सुरूवात केली. 

Virat changed after marriage