विराट कोहली याचे कर्णधारपद धोक्यात, या खेळाडूला मोठी संधी

Cricket News : भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी. क्रिकेट विश्वात मोठी उलथापालथ होत आहे. 

Updated: Dec 7, 2021, 12:40 PM IST
विराट कोहली याचे कर्णधारपद धोक्यात, या खेळाडूला मोठी संधी
संग्रहित छाया

मुंबई : Cricket News : भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी. क्रिकेट विश्वात मोठी उलथापालथ होत आहे. विरोट कोहली (Virat Kohli) याला आपले कर्णधार पद गमवावे लागण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा वन-डेचा कर्णधार विराट कोहली याचे पद धोक्यात आले आहे. विराट याने टी इंडियाच्या टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले तेव्हापासून रोहित शर्मा याच्या नवाची चर्चा सुरु झाली. (Virat Kohli’s captaincy future to be discussed, Rohit Sharma set to lead in South Africa ODI)

या आठवड्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता असून रोहित शर्मा याला नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विराट याच्याकडून वनडे कप्तानपद गेल्यानंतर विराटला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. या विजयाचे जितके कर्णधार विराट रोहली याचे कौतुक होत आहे, तितकेच श्रेय युवा खेळाडूंना दिले जात आहे. आता या युवा खेळाडुंनी आता कर्णधार कोहली याचे टेन्शन वाढवले आहे. 

विराट कोहली याने टीम इंडियाच्या टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले तेव्हापासून रोहित शर्मा वनडेमध्येही कर्णधार होणार की नाही, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. विराटने टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर भारत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे मालिका खेळणार आहे.

रोहित याच्या नेतृत्वात भारताने टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली. त्यामुळे आता रोहित याला अजून एक मोठं पद मिळणार असल्याची चर्चा आहे. या आठवड्यात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह मोठे निर्णय घेऊ शकतात, ज्याचा भारतीय क्रिकेटवर दीर्घकाळ परिणाम होईल, अशी चर्चा आहे.