मॅच सुरू असताना विराट रोहितबद्दल नेमकं काय म्हणाला होता? 5 वर्षानंतर खुद्द अश्विनने केला खुलासा!

Ravichandran Ashwin Statement : विराट (Virat Kohli) आणि रोहित (Rohit Sharma) यांच्या आत्मविश्वासावर आर आश्विनने मोठं वक्तव्य करत चर्चेला पूर्णविराम लगावला आहे. त्यावेळी त्याने 5 वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला.

Updated: Sep 15, 2023, 01:24 PM IST
मॅच सुरू असताना विराट रोहितबद्दल नेमकं काय म्हणाला होता? 5 वर्षानंतर खुद्द अश्विनने केला खुलासा! title=
Virat Kohli, Rohit Sharma, R Ashwin

Virat Kohli on Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या जोरदार फॉर्ममध्ये असून आशिया चषकमध्ये (Asia Cup) चमकदार कामगिरी करत आहे. नुकतंच त्याने वनडेत 10 हजार धावा पूर्ण केल्या. आशिया कप असो की वर्ल्ड कप... रोहित मोठ्या सामान्यात कमालीची कामगिरी बजावताना दिसतो. तर दुसरीकडे विराट कोहली देखील सर्वोत्तम प्रदर्शन करताना दिसतोय. रोहित आणि विराट यांच्यातील बॉण्ड बद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते. दोघांमध्ये नेमकं नात्यात कटुता आलीये का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातो. 2019 च्या वर्ल्ड कपनंतर विराटने तिन्ही फॉर्मटमधून कर्णधारपदावरुन पाय मोकळे केले. त्यावेळी रोहित आणि विराट यांच्यातील वादावर चर्चा झाली होती. अशातच आता, भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने (Ravi Ashwin) त्याच्याबाबत एक जुना किस्सा शेअर केला आहे.

नेमकं काय म्हणाला अश्विन?

अंदाजे पाच-सहा वर्षांपूर्वी जेव्हा रोहित फलंदाजी करत होता, तेव्हा विराट कोहली आणि मी बोलत बसलो होतो. तो कोणता सामना सुरू होता हे मला आठवत नसलं तरी रोहितची फलंदाजी पाहताना मला प्रश्न पडत होता की, विरोधी संघाचे गोलंदाज त्याला कुठं गोलंदाजी करतील? याचा ठावठिकाणा कोणालाच नव्हता. मग मला वाटलं की एकदा रोहित सेट झाला की 15 ते 20 षटकांनंतर तुम्हाला कुठं बॉलिंग करायची हे कळणार नाही, असं अश्विन म्हणतो.

मग विराट कोहलीने (Virat Kohli) मला विचारलं... डेथ ओव्हर्समध्ये समोरच्या कर्णधाराचा कर्दनकाळ कोण आहे हे तुला माहीत आहे का? यावर मी उत्तर दिलं... मी म्हणालो, धोनी आहे का? कोहली म्हणाला, नाही, तो रोहित आहे. जेव्हा मी त्याला विचारले की असं का? तर तो म्हणाला, 'जेव्हा तो सेट होतो, तेव्हा तुला कधीच कळणार नाही की त्याला कुठे गोलंदाजी करायची.', असा किस्सा अश्विनने सांगितला आहे.

आणखी वाचा - Pakistan Team: पाकिस्तान टीमच्या दुःखात भर; एशिया कपच्या पराभवानंतर आणखी एक मोठा झटका

दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन्ही खेळाडू टीम इंडियाचे बॅकबोन आहेत. संघातील सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढील वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही खेळाडू दिसणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रोहित आणि विराटसाठी वर्ल्ड कप जिंका, असं किडतज्ज्ञांनी म्हटलं आहे.