नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तर याच्या मते, टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही खेळू शकतो.
शोएब अख्तरने विराट कोहलीचं मनापासून कौतुक केलं आहे. विराट कोहली आगामी काळात सचिन तेंडुलकरचा १०० आंतरराष्ट्रीय सेंच्युरीचा रेकॉर्डही तोडू शकतो असेही शोएब अख्तरने म्हटलं आहे.
शोएब अख्तरने पुढे म्हटलं की, सचिन तेंडुलकरसोबत विराट कोहलीची तुलना करणं चुकीचं आहे.
शोएब अख्तरने खलीज टाईम्ससोबत बोलताना म्हटलं की, "विराट कोहली आधुनिक युगातील महत्वाचा बॅट्समन आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० सेंच्युरीचा टप्पा ओलांडला आहे. मला वाटतं की, विराट हा एक प्लेअर आहे जो सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडू शकतो. विराटने केवळ खेळाचा आनंद लुटला पाहिजे तसेच त्याने आपल्या तब्येतीचीही काळजी घ्यायला हवी."
शोएब अख्तरने म्हटलं की, जर मिसबाह-उल-हक ४३व्या वर्षापर्यंत खेळू शकतात तर मला विश्वास आहे की विराट कोहली ४४ व्या वर्षापर्यंत सहज खेळेल. इतक्या वयापर्यंत आणि इतक्याच स्पीडने रन्स केल्यास तो सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड तोडू शकतो."