विराटच्या ब्रेकला क्रिकेट बोर्डाचा ब्रेक

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. संघातील खेळाडूंच्या निवडीवर नजर टाकता कर्णधार विराट कोहलीच्या ब्रेकलाच निवडसमितीने ब्रेक लावला आहे. व्यक्तिगत कारण पुढे करत विराटने क्रिकेट श्रीलंका दौऱ्यादरम्यान ब्रेक मागितला होता.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 23, 2017, 12:44 PM IST
विराटच्या ब्रेकला क्रिकेट बोर्डाचा ब्रेक title=

मुंबई : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. संघातील खेळाडूंच्या निवडीवर नजर टाकता कर्णधार विराट कोहलीच्या ब्रेकलाच निवडसमितीने ब्रेक लावला आहे. व्यक्तिगत कारण पुढे करत विराटने क्रिकेट श्रीलंका दौऱ्यादरम्यान ब्रेक मागितला होता.

सूत्रांकडील माहितीनुसार, विराट कोहलीच्या ब्रेकला नकार देत क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी विराट कर्णधार तर, अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेन असेही सूत्रांनी म्हटले आहे. बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली.

विराट कोहली गेले बराच काळ क्रिकेट टूर्नामेंट खेळत आहे. त्यात त्याने आपली कामगिरीही उत्कृष्ठ ठेवली आहे. तरीसुद्धा काहीशी विश्रांती घ्यावी असे त्याला वाटत होती. म्हणून त्याने बीसीसीआयला तशी कल्पनाही दिली होती. मात्र, बीसीसीआयने त्याच्यावर पुन्हा एकदा कर्णधार म्हणूनच शिक्कामोर्तब केले आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात विराट विश्रांतीनंतर सहभागी होणार होता.

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ 

विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मुरली विजय, रोहित शर्मा, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमन साहा, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्या, उमेश यादव