मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.या सीरिजसाठी मोहम्मद शमी आणि मुरली विजयचं कमबॅक झालंय.
या टीममध्ये मोहम्मद शमी आणि मुरली विजयचं कमबॅक झालंय. तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आलीय.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसह न्यूझीलंडवरुद्धच्या टी-20साठीही टीम जाहीर करण्यात आली आहे. या टीममध्ये मुंबईकर श्रेयस अय्यर हा नवा चेहरा आहे.
श्रीलंका सीरिजमधील सामन्यांना 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय. 16 नोव्हेंबरला ईडन गार्डनवर पहिला सामना रंगणार आहे. त्यानंतर 24 नोव्हेंबरला नागपूर आणि 2 डिसेंबरला दिल्लीमध्ये सामना रंगणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ
विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मुरली विजय, रोहित शर्मा, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमन साहा, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्या, उमेश यादव
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नहेरा, मोहम्मद सिराज