Virat Kohli angry : आऊट झाल्यानंतर कोहलीचा ताबा सुटला, वाद घालत बांगलादेशी खेळाडूंना शिवीगाळ? VIDEO व्हायरल

फलंदाजी करत असताना अवघ्या 1 रनवर विराट माघारी परतला. यावेळी विराट कोहलीचं रौद्र रूप (Virat Kohli angry) पुन्हा एकदा चाहत्यांना पाहयला मिळालं. 

Updated: Dec 24, 2022, 05:42 PM IST
Virat Kohli angry : आऊट झाल्यानंतर कोहलीचा ताबा सुटला, वाद घालत बांगलादेशी खेळाडूंना शिवीगाळ? VIDEO व्हायरल title=

Virat Kohli angry at Bangladesh players : भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा (Virat Kohli) बांगलादेशविरूद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (Bangladesh vs India 2nd Test match) तिसरा दिवस फारसा चांगला गेला नाही. एकीकडे फिल्डींग करत असताना 1 तासाच्या आत त्याने 5 कॅच सोडले तर दुसरीकडे फलंदाजी करत असताना अवघ्या 1 रनवर तो माघारी परतला. यावेळी विराट कोहलीचं रौद्र रूप (Virat Kohli angry) पुन्हा एकदा चाहत्यांना पाहयला मिळालं. विकेट गेल्यानंतर विराटचं बांगलादेशाच्या टीमच्या खेळाडूंशी शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Video Viral) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

आऊट झाल्यानंतर संतापला Virat Kohli

खेळाचा तिसरा दिवस हा विराटच्या कोहलीसाठी चांगला गेला नाही. विराट कोहलीने कॅच ड्रॉप केल्याने बांगलादेशाने तुफान फलंदाजी करत भारताला 145 रन्सचं लक्ष्य दिलंय. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने अवघ्या 29 रन्सवर केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल या महत्त्वाच्या खेळाडूंचे 3 विकेट्स गमावलेत. 

या कठीण परिस्थितीचा सामना करताना फलंदाजी विराट कोहली मैदानात उतरला मात्र, त्यालाही टीमसाठी मोठा खेळ करता आला नाही. विराटने 22 बॉल्समध्ये केवळ 1 रन केला. यावेळी आऊट झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापला. झालं असं की, विराटची विकेट गेल्यानंतर बांगलादेशाच्या खेळाडूंना आनंद झाला आणि ते त्याला चिडवायला लागले. 

हे पाहून विराट कोहली संतापला. यावेळी त्याने एकत्र जमलेल्या बांगलादेशी खेळाडूंना चांगलच सुनावलं शिवाय कर्णधार शाकिब अल हसनला देखील रागाच्या भरात बडबडला. यानंतरही पव्हेलियनमध्ये जात असताना विराटने शिवीगाळ केली असल्याचंही बोललं जातंय. या घटनेचा व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम इंडियासमोर इतक्या धावांचे लक्ष्य 

बांगलादेशने टीम इंडियासमोर (Bangladesh vs India) विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेला टीम इंडियाचा (Team India) डाव चांगलाच गडगडला आहे. टीम इंडियाचे 4 खेळाडू 45 धावावर आऊट झाले आहेत. तर सध्या जयदेव उनाडकट (3 धावा) आणि अक्षर पटेल (26 धावा) करून मैदानावर आहेत. 

मेहदी हसनची कमाल

बांगलादेशच्या (Bangladesh vs India) मेहदी हसन (Mehidy Hasan) मिराजने चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि शुभमन गिल या बड्या विकेट घेतल्या आहेत. तर शाकिब अल हसनने केएल राहुलला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीम इंडियाच्या सध्या 45 धावावर 4 विकेट पडल्या आहेत.