वन-डे रँकिंगमध्ये विराट कोहलीचे ९००हून अधिक गुण, 'असं' करणारा पहिला बॅट्समन

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने क्रिकेटच्या इतिहासात एक नवा रेकॉर्ड केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 20, 2018, 05:12 PM IST
वन-डे रँकिंगमध्ये विराट कोहलीचे ९००हून अधिक गुण, 'असं' करणारा पहिला बॅट्समन title=
Image: ICC

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने क्रिकेटच्या इतिहासात एक नवा रेकॉर्ड केला आहे.

९०० गुणांचा आकडा पार

टेस्ट आणि वन-डे क्रिकेटच्या रँकिंगमध्ये ९०० गुणांचा आकडा विराट कोहलीने पार केला आहे. हा आकडा पार करणारा विराट कोहली हा दुसरा बॅट्समन ठरला आहे.

ठरला दुसरा बॅट्समन

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलयर्सनंतर वन-डे आणि टेस्ट रॅकिंगमध्ये ९०० गुणांचा आकडा पार करणारा विराट कोहली दुसरा बॅट्समन आहे.

ब्रायन लाराला टाकलं मागे

विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय वन-डेमध्ये ९०९ गुण आहेत तर टेस्टमध्ये ९१२ गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सहा मॅचेसच्या सीरिजमध्ये ५-१ने विजय मिळवताना विराट कोहलीने तीन सेंच्युरी मारत ५५८ रन्स बनवले. यासोबतच विराटने वन-डे रँकिंगमध्ये ब्रायन लाराला मागेट टाकलं आहे. वन-डे रँकिंगमध्ये ९३५ गुणांसह विवियन रिचर्ड्स पहिल्या क्रमांकावर आहे.

सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा सचिन तेंडुलकरच्या सर्वश्रेष्ठ (८८७ गुण) गुणांपेक्षा २२ गुणांनी पुढे आहे. तेंडुलकरने हे ८८७ गुण जिम्बाब्वे विरोधात जानेवारी १९९८ मध्ये मिळवले होते. तर, ब्रायन लाराने ९०८ गुण मार्च १९९३ मध्ये मिळवले होते.

टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन शिखर धवन याने आफ्रिकेविरोधातील सीरिजमध्ये ३२३ रन्स बनवत १०वं स्थान मिळवत टॉप टेनमध्ये दाखल झाला आहे.