हिटमॅन-कोहलीकडून अजिंक्य रहाणेचा बकरा, रोहित शर्मानं सांगितला 'तो' किस्सा

रोहित शर्मामुळे अजिंक्य रहाणेला या फॅननं केलं किस्स

Updated: May 18, 2021, 02:16 PM IST
हिटमॅन-कोहलीकडून अजिंक्य रहाणेचा बकरा, रोहित शर्मानं सांगितला 'तो' किस्सा

मुंबई: टीम इंडियामध्ये खेळाडू मैदानाबाहेर एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एकमेकांची खेचतात मजा मजा करत असतात. एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांचे काही अविस्मरणीय किस्से देखील समोर येत असतात. टीम इंडियामध्ये श्रीलंका दौऱ्यादरम्यान 2015 सालात घडलेला एक किस्सा आहे. 

हिटमॅन रोहित शर्मानं एका मुलाखतीदरम्यान हा किस्सा देखील सांगितला होता. रोहित शर्मा आणि विराटसेनेनं मिळून अजिंक्य रहाणेचा फॅनसमोर बकरा केला होता. 

व्हॉट द डक सीझन 2 या कार्यक्रमात रोहित शर्मानं हा प्रसंग सांगितला आहे. श्रीलंका दौऱ्यादरम्यान टीम इंडियाचे खेळाडू 10 मिनिटं बसले होते. सर्वांचं जेवण झालं होतं. पुढंचं नियोजन करत असतानाच एक काका आले. हे काका खूप मोठे फॅन आहेत. जेव्हा जेव्हा टीम इंडिया आणि श्रीलंकेचा सामना होतो तेव्हा ते तिथे येऊन डान्स करतात आणि एका खेळाडूला किस्स करतात.

'आम्ही अजिंक्य रहाणेला बकरा करायचं ठरवलं. अजिंक्य रहाणेला सांगितलं की हे काका तुझे खूप मोठे फॅन आहेत. त्यांना तुला भेटायचं आहेत. त्यांनी अजिंक्य रहाणेला पुढे केलं. हे फॅन काका अजिंक्यच्या जवळ गेले आणि त्यांनी अजिंक्यला किस्स केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला होता.'

श्रीलंका दौऱ्यादरम्यानच्या अनेक गमती-जमती देखील रोहितने या कार्यक्रमात शेअर केल्या आहेत. अजिंक्य रहाणेसोबत त्याने केलेला हा प्रॅन्क कधीही न विसरता येणारा असल्याचंही त्याने सांगितलं आहे.