Shahid Afridi Advice To Virat Kohli: आशिया कप स्पर्धेत विराट कोहलीला सूर गवसला आहे. विराटने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत पुन्हा एकदा फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं आहे. विराट कोहलीने टी-20 करिअरमधलं पहिलं शतक झळकावलं आहे. यामुळे विराट कोहलीच्या आयसीसी टी 20 क्रमवारीत सुधारणा झाली आहे. विराटने 14 स्थानांची झेप घेत 15व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत एकूण 276 धावा केल्या. पण आता विराट कोहलीने निवृती घेण्याचा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने दिला आहे.
शाहिद आफ्रिदीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'तुम्ही त्या स्तरावर पोहोचू नका जिथे तुम्हाला संघातून वगळावे लागेल. त्याऐवजी, तुम्ही तुमच्या शिखरावर असताना निवृत्तीची घोषणा केली पाहिजे. जरी हे क्वचितच घडते. फार कमी खेळाडू, विशेषत: आशियाई देशांतील क्रिकेटपटू असा निर्णय घेण्यास सक्षम आहेत, परंतु मला वाटते की विराट जेव्हा हे करेल तेव्हा तो चांगली कामगिरी करेल. आणि कदाचित त्याची कारकीर्द ज्या प्रकारे त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती त्याच प्रकारे संपुष्टात येईल.'
'तो एक चॅम्पियन आहे आणि माझा विश्वास आहे की एक असा टप्पा येतो जेव्हा तुम्ही निवृत्तीकडे जात असता. अशावेळी एका उंचीवर असताना निवृत्ती घेणं गरजेचं आहे.', असंही शाहिद आफ्रिदीने पुढे सांगितलं.
शाहिद आफ्रिदीच्या सल्ल्यानंतर टीम इंडियाचा क्रिकेटपटू अमित मिश्राने प्रतिक्रिया दिली आहे. झी न्यूजचं ट्विट रिट्विट करत अमित मिश्राने लिहिले, 'प्रिय आफ्रिदी, काही लोक फक्त एकदाच निवृत्त होतात त्यामुळे कृपया विराट कोहलीला या सर्व गोष्टींपासून दूर ठेव.'
Dear Afridi, some people retire only once so please spare Virat Kohli from all this. https://t.co/PHlH1PJh2r
— Amit Mishra (@MishiAmit) September 13, 2022
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे त्याचं पहिलं टी20 शतक आहे. आशिया कप 2022 मधलं देखील हे पहिलं शतक आहे. विराट कोहलीच्या नावावर याआधी वनडे आणि टेस्ट मिळून 70 शतकं होती. आता टी20 मध्ये पहिलं शतक झळकावल्या नंतर त्याच्या नावावर 71 शतकांची नोंद झाली आहे.