मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज ३० वा वाढदिवस आहे. तिचा जन्म १ मे १९८८ ला उत्तरप्रदेशात झाला. २००८ मध्ये तिने शाहरुख खानसोबत रब ने बना दी जोडी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. विराट अनुष्का २०१३ मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान भेटले. त्यानंतर झालेल्या ओळखीचे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. २०१७ मध्ये विवाह करुन त्यांनी आपल्या प्रेमाच्या नात्याला पूर्णत्व दिले. विराट अनुष्काच्या प्रेमाच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. २०१४-१५ मध्ये त्यांच्या प्रेमाच्या जोरदार चर्चा होत्या. तर २०१६ मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते.
आज वाढदिवसानिमित्त विराट कोहलीने अनुष्काला शर्माला शुभेच्छा दिल्या. विराटने अनुष्काला केक भरवताना एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत विराटने लिहिले की, हॅप्पी बर्थडे माय लव... मला माहित असलेली सर्वात सकारात्मक आणि प्रामाणिक व्यक्ती... लव यू...
Happy B'day my love. The most positive and honest person I know. Love you pic.twitter.com/WTepj5e4pe
— Virat Kohli (@imVkohli) May 1, 2018
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबद्ध झाले. काही खास नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत इटलीत दोघे विवाहबद्ध झाले.