सेहवागच्या एक शब्दावर पाकिस्तानच्या कॅप्टननं बदलली फील्डिंग, काय होतं नेमकं कारण?

पाकिस्तानच्या कर्णधाराला सेहवागनं चक्क फील्डिंग चेंज करायला लावली होती. 

Updated: May 14, 2021, 12:19 PM IST
सेहवागच्या एक शब्दावर पाकिस्तानच्या कॅप्टननं बदलली फील्डिंग, काय होतं नेमकं कारण?

मुंबई: विरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो ते कायम मैदानातील घटनांवर आपलं मत मांडत असतो. मैदानात देखील त्याच्या विस्फोटक फलंदाजीचे चाहते काही कमी नव्हते. सचिन आणि विरेंद्र सेहवाग यांनी भागीदारीमध्ये मिळून केलेल्या धावा असो किंवा लाला स्टाइल खेळी असो कायमच विरेंद्र सेहवाग चर्चेत राहिला आहे. 

विरेंद्र सेहवाग जस क्रिझवर खेळताना गाणं गुणगुणायची सवय होती तसंच त्याला प्रत्येक बॉल हा कायम चौकार किंवा षटकार जावा यासाठी प्रयत्न असायचे. पाकिस्तानी संघासोबतचा एक मजेशीर किस्सा सेहवागने शेअर केला आहे. 

विक्रम साठे यांचा शो व्हॉ द डकमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये विरेंद्र सेहवागने एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. त्याच्या एक शब्दावर पाकिस्तानचा कर्णधार इंजमाम उल हक याने फील्डिंग बदलली होती. 

पाकिस्तान विरुद्धच्या एका सामन्यात सेहवागला सिक्स मारायची खूप हौस आली होती. त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार इंजमाम उल हक होता. सेहवागनं त्याला सांगितलं. 'मला सिक्स मारायचा आहे तर फील्डिंग चेंज कर ना!' असं म्हटल्यानंतर त्याने एका सिक्ससाठी फील्डिंग बदलली होती.

खेळताना गाणी का गुणगुणायचा? विरेंद्र सेहवागनं सांगितला 'तो' किस्सा

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक हा पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. ड्रेसिंग रूम असो किंवा मैदान एक महत्त्वाची व्यक्ती इंजमाम हा पाकिस्तानकडून खेळणार्‍या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. पाकिस्तानकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त म्हणजे 11739 धावा करणारा इंजमाम कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय इंजमाम आपल्या शांत स्वभावासाठी खूप प्रसिद्ध आहे. 

वीरेंद्र सेहवागने 104 कसोटी सामन्यांत देशासाठी 85, 86, 251 एकदिवसीय सामन्यात 8273 आणि 19 टी -20 मध्ये 394 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलचे 104 सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने 2728 धावा केल्या आहेत. सेहवागनं आपल्या कारकीर्दीत कसोटीत 6 दुहेरी शतके आणि वनडेमध्ये एक द्विशतक झळकावलं आहे.