Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावून जाल!

Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: May 31, 2024, 09:35 AM IST
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावून जाल! title=

Rohit Sharma: 2 जूनपासून आयसीसी वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियासाठी या मिशनची सुरुवात आयरलँडविरूद्धच्या सामन्यापासून होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 5 जून रोजी आयरलँडविरूद्ध मैदानात उतरणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवानंतर हा टी-20 वर्ल्डकप जिंकावा अशी चाहत्यांची तसंच खेळाडूंचीही इच्छा आहे. दरम्यान वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे. 

तुमचा बेस्ट परफॉर्मन्स देणं गरजेचं

रोहित शर्मा म्हणतोय, वर्ल्डकपचं प्रेशर नेहमीच असतं. कारण वर्ल्डकप हा वर्ल्डकप आहे. या काळात तुम्हाला तुमचा बेस्ट परफॉर्मन्स देणं भाग आहे. या स्पर्धेमध्ये जितके खेळाडू, तितके देश खेळतात ते सर्व त्यांच्या परफॉर्मन्स एक स्तर वर देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमच्यासाठी एक खेळाडू म्हणून हे खूप मोठं आव्हान असतं. कारण तुम्हाला माहिती असतं, या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही गोष्टी सोप्या मिळणार नाहीयेत. 

यंदाच्या वेळी आमच्याकडे चांगली संधी

रोहित शर्मा पुढे म्हणाला, आमच्याकडे अनुभव आहे, आमच्याकडे अग्रेशन आहे, तरूण खेळाडूही आहे. याचाच अर्थ आमच्याकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही आहे. त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला खेळाचा आनंद घ्यायचा आहे. 2007 चा पहिला टी-20 वर्ल्डकप आम्ही जिंकलो. त्यानंतर आम्ही चांगली कामगिरी केली, मात्र जिंकू शकलो नाही. त्यामुळे यंदाच्या वेळी आमच्याकडे एक चांगली संधी आहे चॅम्पियन होण्याची. 

टी-20 वर्ल्डकपसाठी कसा आहे टीम इंडियाचा स्क्वॉड?

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

रिझर्व प्लेअर्स- शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान

T20 वर्ल्डकप 2024 मधील टीम इंडियाचं वेळापत्रक

  • भारत विरुद्ध आयर्लंड – ५ जून (न्यूयॉर्क)
  • भारत विरुद्ध पाकिस्तान - ९ जून (न्यूयॉर्क)
  • भारत विरुद्ध यूएसए - १२ जून (न्यूयॉर्क)
  • भारत विरुद्ध कॅनडा - १५ जून (फ्लोरिडा)