IPL दरम्यान प्रीती झिंटाच्या जवळ असलेलं हे गोंडस बाळ कुणाचं? फोटो होताय व्हायरल

प्रीतीच्या जवळ असलेलं हे बाळ कोणाचं आहे. असा प्रश्न अनेकांना पडला होता.

Updated: Oct 2, 2021, 11:03 PM IST
IPL दरम्यान प्रीती झिंटाच्या जवळ असलेलं हे गोंडस बाळ कुणाचं? फोटो होताय व्हायरल title=

दुबई : आयपीएल 2021 मध्ये, 1 ऑक्टोबरच्या संध्याकाळी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात, केएल राहुलच्या शानदार फलंदाजीमुळे, पंजाब किंग्सने केकेआरचा 5 गडी राखून पराभव केला. या खेळाचा परिणाम काहीही झाला असेल, पण स्टँडमधील एका गोंडस चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कोण आहे हे गोंडस बाळ?

या सुपरहिट सामन्यादरम्यान पंजाब किंग्जची सह-ओनर प्रीती झिंटाच्या मांडीवर एक गोंडस मूल दिसले. हे बाळ कोणाचं आहे हे चाहत्यांना समजू शकले नाही. त्यानंतर मुलाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

बाळाचे पालक कोण आहेत?

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर, प्रीती झिंटाच्या मांडीवर बसलेला हा लहान मुलगा पंजाब किंग्ज संघाचा खेळाडू किंवा व्यवस्थापनाचा सदस्य असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण खूप संशोधन केल्यावर त्याच्या पालकांचे नाव समोर आले.

मनदीप सिंगचा मुलगा

जेव्हा आम्ही पंजाब किंग्ज संघाचा क्रिकेटपटू मनदीप सिंगची इन्स्टाग्राम  फोटो  पाहिले तेव्हा असे दिसून आले की हा त्याचा मुलगा राजवीर सिंह आहे ज्याचा जन्म 16 जानेवारी 2021 रोजी झाला होता. विशेष म्हणजे, मनदीपने जगदीप जसवालसोबत 2016 मध्ये लग्न केले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandeep Singh (@mandeeps12)

आयपीएल 2021 च्या दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा बऱ्याचदा स्टेडियममध्ये तिच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित असते, चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.