Rahul Dravid Statement : रोहित-विराट का करत नाहीत फलंदाजी? कोच राहुल द्रविड यांच्या विधानाने खळबळ

Indian Head Coach Rahul Dravid Statement : यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडिया ( Team India ) दावेदार मानली जातेय. यंदाही वर्ल्डकपच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. मात्र कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) गोलंदाजी का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 22, 2023, 04:36 PM IST
Rahul Dravid Statement : रोहित-विराट का करत नाहीत फलंदाजी? कोच राहुल द्रविड यांच्या विधानाने खळबळ title=

Indian Head Coach Rahul Dravid Statement : यंदाचा वर्ल्डकप ( World Cup 2023 ) अत्यंत खास असणार आहे, याचं कारण म्हणजे तो भारतात खेळवला जाणार आहे. यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडिया ( Team India ) दावेदार मानली जातेय. यंदाही वर्ल्डकपच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. मात्र कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) गोलंदाजी का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान यावर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी उत्तर दिलं आहे. 

सिनीयर क्रिकेटर करायचे गोलंदाजी

टीम इंडियाचा 'थिंक टँक' अलिकडच्या वर्षांमध्ये अधिकाधिक ऑलराऊंडर्स खेळण्यावर भर देतोय. ज्याचा सध्याच्या पिढीच्या टॉप ऑर्डरच्या खेळाडूंचा गोलंदाजीशी काहीही संबंध नाही. पूर्वीचे वरिष्ठ क्रिकेटपटू असं करत होते. 

बदल का झाला?

सध्या टीम इंडियामध्ये टीममध्ये ( Team India ) विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव आहे जे गोलंदाजी करत नाहीत. यावर राहुल द्रविड ( Rahul Dravid ) म्हणाले की, मला असं वाटतं की, हे नियम बदलामुळे असावं. अचानक सर्कलमध्ये 4 ते 5 फिल्डर्स ठेवायला सुरुवात केली. मला वाटतं की, यामुळे मधल्या ओव्हर्स टाकण्याच्या तात्पुरत्या गोलंदाजाच्या क्षमतेत मोठा बदल झालाय.

सुर्यकुमारच्या 'त्या' एक्शनवरून झाला मोठा गदारोळ

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवच्या एका एक्शनमुळे मोठा गदारोळ माजला होता. काही वर्षांपूर्वी हा प्रकार आयपीएलची टीम मुंबई इंडियन्समध्ये घडला होता. या प्रकारानंतर सूर्याने नंतर कधीही गोलंदाजी केली नाही. सूर्याकुमारपूर्वी शिखर धवन देखील ऑफ स्पिन गोलंदाजी करायचा. मात्र यावेळी अयोग्य एक्शनमुळे त्याला बोलवण्यात आलं होतं. तेव्हापासून त्याने गोलंदाजी करणं सोडून दिलं होतं. 

कशी आहे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया?

रोहित शर्मा ( कर्णधार ), हार्दिक पंड्या ( उप-कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.