India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS 3rd T20I) आज गुवाहाटी येथे खेळवला जातोय. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया आज खेळण्यासाठी गुवाहाटीत दाखल होईल तेव्हा मालिका विजयाची संधी टीम इंडियाकडे (Team India) असणार आहे. मात्र, सिरीज खिशात घालण्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा युवा गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) टीममधून बाहेर झाला आहे. स्वत: मुकेश कुमारने संघातून बाहेर होण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केली होती. त्याचं कारण नेमकं आहे काय? पाहुया...
वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने BCCI ला गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यापूर्वी भारतीय संघातून मुक्त करण्याची विनंती केली. मुकेशचे लग्न झाले आहे आणि त्याच्या लग्नाच्या उत्सवाच्या कालावधीसाठी त्याला रजा मंजूर करण्यात आली आहे. रायपूर येथे होणाऱ्या चौथ्या T20 सामन्यापूर्वी तो संघात सामील होईल. उर्वरित मालिकेसाठी वेगवान गोलंदाज दीपक चहरचा (Deepak Chahar) भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
Update: Fast bowler Mukesh Kumar made a request to BCCI to be released from India’s squad ahead of the third T20I against Australia in Guwahati. Mukesh is getting married and has been granted leave for the duration of his wedding festivities.
He will join the squad ahead of the…
— BCCI (@BCCI) November 28, 2023
टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (WK), सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, टिळक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा.
टीम ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (C), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन.