कोहलीच्या बॅटचा 'ती' करणार शस्त्रासारखा वापर

दक्षिण अफ्रिकेत खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टी-२०मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध ७२ धावांची खेळी केली होती. त्याची ही खेळी पाहून डेनियलने ट्विटरच्या माध्यमातून कोहलीला प्रोपज करत त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

Annaso Chavare Updated: Mar 13, 2018, 04:24 PM IST
कोहलीच्या बॅटचा 'ती' करणार शस्त्रासारखा वापर title=

नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-२० सामन्यात केवळ ५६ चेंडूत शतकी खेळी करून डॅनियल वेट कौतुकास पात्र ठरली. पण, इग्लंडच्या या महिला क्रिकेटपटूकडे आता आणखी एक खतरनाक वस्तू आली आहे. जिचा वापर ती या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या त्रिकोणी मालिकेदरम्यान करणार आहे.

तिने केले कोहलीला प्रपोज

डेनियलच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात अनेक मजेशीर खुलासे पुढे आले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना डेनियल म्हणते की, २०१४मध्ये इग्लंड दौऱ्यात तिची कोहलीसोबत भेट झाली. त्या वर्षी कोहलीने दक्षिण अफ्रिकेत खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टी-२०मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध ७२ धावांची खेळी केली होती. त्याची ही खेळी पाहून डेनियलने ट्विटरच्या माध्यमातून कोहलीला प्रोपज करत त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

दरम्यान, पुढे ती सांगते की, ट्विट केल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटानंतर मी माझे ट्विटर अकाऊंट पाहिले तर त्यावर चक्क १ हजार पेक्षाही जास्त रिट्विट झाले होते. तर, भारती प्रसारमाध्यमांवरही ही बातमी जोरदार झळकत होती. ते माझ्या वडिलांना ईमेल करत होते.

कोहीलीने तिला दिली समज

दरम्यान, जेव्हा आपली भेट कोहलीशी झाली तेव्हा त्याने, तू ट्विटरवर असे वर्तन करू शकत नाही. मी अशा गोष्टी गांभिर्याने घेतो असे सांगितले. तेव्हा मी ओके, सॉरी असे त्याला म्हटल्याचेही डॅनियल सांगते. दरम्यान, ११ डिसेंबर २०१७ ला विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने इटलीमध्ये विवाह केला. त्यानंतर डॅनियलने दोघांचे अभिनंदनही केले होते.

कोहलीने भेट दिली बॅट

दरम्यान, जेव्हा कोहलीच्या ध्यानात आले की डॅनियल ही आपली चाहती आहे आणि ती आपल्या व्यक्तिमत्वाने चांगलीच प्रभावीतझाली आहे. तेव्हा, त्याने तिला एक बॅट भेट दिली. कोहलीची बॅट पाहून डॅनियल भलतीच खूश आहे. तसेच, कोहलीने भेट दिलेल्या बॅटचा पहिल्यांदाच वापर करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. त्यासाठी तिने या महिन्या अखेर भारत आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेची निवड केली आहे.