इतिहास आहे साक्षीदार! पाकिस्तानविरोधात नेहमी भारताचंच पारड जड...

भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट इतिहास या दोघांमध्ये 1952 साली खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आहे. 

Updated: Oct 24, 2021, 12:34 PM IST
इतिहास आहे साक्षीदार! पाकिस्तानविरोधात नेहमी भारताचंच पारड जड...

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक आहे. जगात कुठेही हे दोन्ही टीम्स भिडल्या आहेत. जगभरातील लोकांच्या नजरा या सामन्यावर खिळल्या आहेत. भारत-पाक शस्त्रुत्वाचा इतिहास जवळपास सात दशकांचा आहे. पण आजही दोघांचा सामना तितकाच रोमांचक होताना दिसतो.

भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट इतिहास या दोघांमध्ये 1952 साली खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आहे. त्यानंतर हे दोन्ही देश वनडे आणि टी-20 मध्येही अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. अशा परिस्थितीत विशेष बाब म्हणजे कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही फॉरमॅटमधील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि T-20

  • पहिला कसोटी सामना ऑक्टोबर 1952 मध्ये दिल्लीत खेळला गेला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये 59 कसोटी सामने खेळले गेले आहेत.
  • दोन्ही देशांमधील पहिला एकदिवसीय सामना ऑक्टोबर 1978 मध्ये क्वेटा इथे खेळला गेला. तेव्हापासून हे दोन्ही देशांनी 132 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
  • पहिला T-20 सामना 14 सप्टेंबर 2007 रोजी डर्बनमध्ये खेळला गेला. तेव्हापासून हे दोन देश टी -20 क्रिकेटमध्ये आठ वेळा आमनेसामने आले आहेत.
  • सीमेवरील तणावामुळे क्रिकेट संबंध विस्कळीत होण्यापूर्वी 2007 मध्ये दोघांमधील शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता.
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 1 ऑक्टोबर 1978 रोजी क्वेटाच खेळला गेला. यामध्ये भारताने चार धावांनी विजय मिळवला.
  • दोन्ही संघांमधील शेवटचा एकदिवसीय सामना जून 2019 मध्ये इंग्लंडमधील विश्वचषकादरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला होता.

आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारत-पाकिस्तानचा विक्रम

भारतीय संघाने आयसीसी स्पर्धेत 17 पैकी 13 सामने पाकिस्तानविरुद्ध जिंकले. पाकिस्तानला केवळ तीन सामने जिंकता आले आहेत, तर एक सामना बरोबरीत आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 50 ओव्हर्सच्या विश्वचषकातील सातंही सामने जिंकले आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी -20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. तर टाय-आउटनंतर 2007च्या टी-20 वर्ल्डकप सामन्यात भारतीय संघाची विजेता म्हणून निवड झाली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या पाच सामन्यांपैकी भारताने दोन, तर पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत.