ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय महिला टीमची घोषणा बीसीसीआयनं केली आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 27, 2018, 07:46 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय महिला टीमची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजसाठी ही टीम निवडण्यात आली आहे. बडोद्यामध्ये या मॅच खेळवण्यात येणार आहेत.

वनडे सीरिजनंत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 मॅचची सीरिजही होणार आहे. या टीमची निवड नंतर करण्यात येणार आहे. या दोन्ही टीममध्ये पहिली वनडे १२ मार्चला, दुसरी वनडे १५ मार्चला आणि तिसरी वनडे १८ मार्चला खेळवली जाईल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर आता महिला टीम ऑस्ट्रेलियाला धुळ चारायला सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ३ मॅचची वनडे सीरिज भारतानं जिंकल्यानंतर पाच टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ३-१नं विजय झाला. आफ्रिकेच्या एकाच दौऱ्यात २ सीरिज जिंकणारी भारतीय महिला टीम ही पहिलीच टीम आहे.

अशी आहे भारतीय टीम

मिताली राज(कॅप्टन), हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम राऊत, जेमिमाह रोड्रिग्ज, वेदा कृष्णमुर्ती, मोना मेशराम, सुषमा वर्मा(विकेट कीपर), एकता बिष्ट, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, सुकन्या परिदा, पूजा वास्त्राकर, दिप्ती शर्मा