close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : टीम इंडियामध्ये या खेळाडूला संधी द्या, सचिनची मागणी

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पहिला सामना गमावला.

Updated: Jul 1, 2019, 05:07 PM IST
World Cup 2019 : टीम इंडियामध्ये या खेळाडूला संधी द्या, सचिनची मागणी

बर्मिंघम : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पहिला सामना गमावला. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ३१ रनने पराभव झाला. यानंतर पुढच्या मॅचसाठी टीममध्ये बदल करण्यात यावेत, अशी मागणी सचिन तेंडुलकरने केली आहे. टीम इंडियाने केदार जाधवच्याऐवजी रवींद्र जडेजाला संधी द्यावी, असा सल्ला सचिनने दिला आहे.

'इंग्लंडच्या दोन्ही राईट हॅण्डेड बॅट्समननी भारताच्या दोन्ही स्पिनरवर आक्रमण केलं. त्यामुळे जडेजाला घेतलं तर डावखुऱ्या स्पिनरचा बदल टीममध्ये येईल. केदारला जर सातव्या क्रमांकावर खेळवायचं असेल, तर तो या क्रमांकावर प्रभाव पाडू शकतो का? हे पाहावं लागेल. त्यामुळे त्या जागेवर तुम्ही जडेजाला खेळवू शकता. त्याच्या बॉलिंगचा वापरही करता येईल. यावर टीम प्रशासन विचार करेल. कारण जशी स्पर्धा पुढे जाते, तसं तुम्हाला वेगवेगळे पर्याय आणि कल्पना सुचत जातात,' असं सचिन म्हणाला. एका हिंदी वृत्तवाहिनीशी सचिन बोलत होता.

याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी सचिनने धोनी आणि केदार जाधवच्या संथ खेळीवर नाराजी जाहीर केली होती. धोनी आणि केदारने थोडी सकारात्मकता दाखवायला पाहिजे होती, असं मत सचिनने तेव्हा व्यक्त केलं होतं.

इंग्लंडविरुद्धच्या मॅचवेळीही मोठी धावसंख्येचा पाठलाग करत असताना धोनी आणि केदार जाधवने आक्रमक खेळी केली नाही. या दोघांमध्ये ३१ बॉलमध्ये ३९ रनची पार्टनरशीप झाली. शेवटच्या काही ओव्हरमध्ये फोर आणि सिक्सची गरज असतानाही केदार आणि धोनी एक-एक रन काढत होते. या दोघांनी ३१ बॉलच्याच्या पार्टनरशीपमध्ये ७ बॉलला एकही रन काढली नाही. तर २० एक रन, ३ फोर आणि १ सिक्स लगावली.