World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये पावसाचा खेळ, चाहते निराश

२०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.

Updated: Jun 12, 2019, 06:40 PM IST
World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये पावसाचा खेळ, चाहते निराश title=

लंडन : २०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. पण या वर्ल्ड कपमधले अनेक सामने पावसामुळे रद्द झाले, तर काही सामन्यांचा निकाल डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे लागला. इंग्लंडमधल्या या पावसामुळे क्रिकेट चाहते मात्र निराश झाले आहेत. 

आपल्याकडे येरे येरे पावसा अशी साद घातली जात आहे. तर तिकडे इंग्लंडमध्ये सध्या क्रिकेटप्रेमी Rain, Rain go away, let the poor world cup get some play असं म्हणत आहेत. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पावसानं विश्वचषकाचा चांगलाच विचका केला आहे. आतापर्यंत चार सामन्यांपैकी काही सामने एकतर रद्द झालेत किंवा अनिर्णित राहिलेत किंवा डकवर्थ लुईसप्रमाणे सामन्याचा निकाल लागलाय. हवामान खात्याने ब्रिटनमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावासमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील इतर सामन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे, याचा नक्कीच गुणतालिकेवर परिणाम होणार आहे. 

एकीकडे क्रिकेट टीम पावसाच्या या व्यत्ययामुळे चिंतेत आहेत. तर दुसरीकडे नेटीझन्सचे समाज माध्यमांवरील पावसाचे मिम्स मनोरंजन करत आहेत. पाऊसच दमदार खेळत असून तोच उपांत्य फेरी गाठणार असा एक संदेश फिरत आहे. तर खेळाडू पाण्यामध्ये आणि तराफावर खेळताना, चषक पाण्यात बुडताना, स्टेडियमचं तळ झालेले असे अनेक मिम्स व्हायरल झालेत.

वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा भारत आणि पाकिस्तानमधील सामना १६ जून रोजी पार पडणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट आहे. हा सामना रद्द होऊ नये अशीच प्रार्थना आता क्रिकेटप्रेमी करत आहेत. गुरुवारी भारत आणि न्यूझीलंडमधल्या मॅचमध्येही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.