भारत-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान विराट-गंभीरच्या चाहत्यांमध्ये मारामारी? Video Viral

IND vs AFG : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाची विजयी वाटचाल सुरूच आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. पण यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये चाहत्यांमध्ये मारामारी होताना दिसत आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 12, 2023, 11:22 AM IST
भारत-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान विराट-गंभीरच्या चाहत्यांमध्ये मारामारी? Video Viral title=

IND vs AFG : भारतीय क्रिकेट संघाने (Team India) बुधवारी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधील (World Cup 2023) सामन्यात अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) झालेल्या या सामन्यात भारताने आठ गडी राखून अफगाणिस्तानवर विजय मिळवला. मात्र स्टेडिअमधील स्टँडवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा बनला. व्हिडिओमध्ये अरुण जेटली स्टेडियमच्या स्टँडमध्ये भारतीय चाहते मारामारी करताना दिसत आहेत. दिल्लीतील (Delhi) स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीमध्ये काही चाहते एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत.

क्रिकेट सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये मारामारी होणे ही काही नवीन गोष्ट नाही. स्टेडियममधील चाहत्यांमधील भांडणे ही कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. भारत-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर उपस्थित भारतीय चाहत्यांमध्ये चांगलीच हाणामारी झाल्याचे पाहायला मिळालं आहे. चाहत्यांमधील वाद इतका वाढले की ते  हाणामारीपर्यंत पोहोचले आणि एकमेकांना शिवीगाळ करु लागले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, नवीन-उल-हक आणि विराट कोहली मैदानात मित्र झाले आहेत, त्यामुळेच त्यांच्यात भांडणे झाली आहेत. हे विराट कोहली आणि गौतम गंभीरचे चाहते असू शकतात, असेही काही चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी एका चाहत्याने असेही म्हटले आहे की, ही मारामारी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये होत आहे. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला याची कोणतीच माहिती समोर आले नाही.

 

रोहित शर्माने झळकावले 31 वे वनडे शतक 

दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा हा सामन्याचा मेगास्टार होता. रोहितने विक्रमी शतक झळकावून भारताला केवळ 35 षटकात 273 धावांचे लक्ष्य गाठून दिलं आहे. रोहित शर्माने या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकले. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. भारताने बुधवारी अफगाणिस्तानचा 8 विकेटने पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर अफगाणिस्तानने 273 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 35 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. रोहितने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांसह 131 धावा केल्या.