IND vs PAK Viral Video : एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 12 वा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने 30 व्या ओव्हरमध्येच पाकिस्तानने दिलेलं टार्गेट पूर्ण केलं आणि वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) इतिहासाच सलग 8 व्यांदा पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडियाने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. भारत पाकिस्तान सामना म्हटलं तर राडा होणारच. दोन्ही देशातील खेळाडूंमध्ये नेहमी भांडणं दिसून येतात. मात्र, आता स्टेडियममधील प्रेक्षकांमध्येच राडा झाल्याचं पहायला मिळतंय. नुकताच एक व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. ज्यामध्ये एक तरुण महिला पोलिसाला कानशिलात लगावताना दिसत आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये स्टँडवर बसलेला एक पुरुष आणि एक महिला पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. काही कारणास्तव महिला पोलीस तरुणाच्या कृतीवरून त्याला ओरडत होती. त्यावेळी दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. प्रेक्षकाला सांगून देखील एकेना झाल्यावर महिला पोलीसने थेट तरुणाच्या कानशिलास लगावली. त्यानंतर तरुणाचा पारा देखील चढला. त्याने देखील महिला पोलिसाच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला.
पहायला गेलं तर अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमची प्रेक्षक संख्या आहे 1 लाख 32 हजार...भारत पाकिस्तान सामन्यात स्टेडियम खचाखच भरलं होतं. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारंबळ उडाली होती. प्रेक्षकांना आवरता आवरता नाकीनऊ आलं. त्यामुळे पोलिसांचा संयम देखील संपत होता. तर दुसरीकडे भारत-पाक असल्याने प्रेक्षकांचा जोश कमी होत नव्हता. अशातच अनेक प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचे फिटेज देखील समोर आले आहेत. अशातच महिला पोलिसाने कानाखाली मारल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकी चूक कोणाची असा सवाल विचारला जात आहे.
तरुणीने कानशिलात मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पारा चढला आणि तिने आगपाखड केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जमावाला हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर सामन्यातील वातावरण शांत झालं.
आणखी वाचा - वर्ल्ड कप सुरू असतानाच इंग्लंडला मोठा धक्का; 'या' स्टार खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती!
दरम्यान, भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने 191 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना कॅप्टन रोहित शर्मा याने दमदार 86 धावांची खेळी केली.