इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट याने दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यानंतर मुंबईच्या वानखेडे मैदानात आपण कोणत्या स्थितीत खेळलो याबद्दल काही खुलासे केले आहेत. शनिवारी वानखेडे मैदानात झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघासमोर दक्षिण आफ्रिकेने तब्बल 399 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड संघ फक्त 22 ओव्हर्समध्ये 170 धावांवर गारद झाला. इंग्लंडला 229 धावांनी लाजिरवणारा पराभव झाला. एकदिवसीय क्रिकेटमधील हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे.
जो रुट याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंना खेळादरम्यान किती तीव्र उष्णता आणि आर्द्रतेचा सामना करावा लागला, याचा उल्लेख केला आहे. "मी याआधी कधीच अशा वातावरणात खेळलेलो नाही. मी नक्कीच यापेक्षा तीव्र उष्णता आणि आर्द्रता असणाऱ्या ठिकाणी खेळलो आहे. पण येथे मला जणू काही श्वास घेण्यास त्रास होत आहे असं वाटत होतं. जणू काही तुम्ही हवाच खात आहात. हे वेगळं होतं. तुम्ही हेन्रिरकडे पाहूनही हा अनुभव घेऊ शकता. तो पुन्हा मैदानावर परत येऊच शकला नाही," असं जो रुटने सांगितलं.
जो रुटने यावेळी आदिल रशीद गोलंदाजी करताना आवाज काढत होता सांगता, त्याला श्वास घेताना त्रास जाणवत असल्याचा दावा केला. 32 वर्षीय खेळाडू पुढे म्हणाला की, खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताच त्यांची जर्सी पूर्णपणे भिजली होती. तो पुढे म्हणाला की रशीदला खेळादरम्यान गोलंदाजी करणं खरोखर कठीण असल्याचं दिसून आले.
"तुम्ही हे टाळू शकत नाही. तुम्ही मैदानात येता तेव्हात तुमचं टी-शर्ट भिजलेलं असत. तुमचा श्वासही जड झालेला असतो. तुमचा फिटनेस आणि इतर गोष्टी तुम्हाला माहिती असतात. त्यामुळे तुम्हाला याची कल्पना असते," असं जो रुट म्हणाला.
"राशीदने चांगली खेळी केली. त्याने संघासाठी मोलाचं योगदान दिलं. गोलंदाजी केल्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी जात असताना आवाज येत होता. तो आपला श्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. हे फार आव्हानात्मक होतं. परंतु वर्षाच्या यावेळी तुम्ही भारतात खेळण्यासाठी बाहेर पडता तेव्हा अशा गोष्टींचा सामना करावा लागोत,” असंही तो म्हणाला.