World Test Championship च्या दिशेने भारताचं एक पाऊल पुढे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध असं असेल गणित

World Test Championship Points Table: बांगलादेशला 2-0 ने पराभूत करत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आठ विजय आणि दोन ड्रॉसह भारताचे 58.93 टक्के गुण झाले आहेत. 

Updated: Dec 25, 2022, 03:33 PM IST
World Test Championship च्या दिशेने भारताचं एक पाऊल पुढे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध असं असेल गणित title=

World Test Championship Points Table: बांगलादेशला 2-0 ने पराभूत करत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आठ विजय आणि दोन ड्रॉसह भारताचे 58.93 टक्के गुण झाले आहेत. दक्षिण आफ्रिका 54.55 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 76.92 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र अजूनही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे नेमकं गणित कसं असेल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारताची एक चूक दक्षिण आफ्रिकेचा रस्ता मोकळा करू शकते. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलिया 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. 

अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन संघात काँटे की टक्कर आहे. तर ऑस्ट्रेलियाने आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 4-0 ने मात दिल्यास विजयी टक्केवारी 68.1 टक्के होईल आणि अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. मात्र ऑस्ट्रेलियाला मात देणं वाटतं तितकं सोपं नाही. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. गणित कसं असेल आकडेवारी पाहून तुमच्या लक्षात येईल.

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत एकही सामना न जिंकल्यास विजयी टक्केवारी 45.8 टक्के होईल. त्यामुळे अंतिम फेरीच्या आशा मावळतील.
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने एकच सामना जिंकल्यास विजयी टक्केवारी 51.4 टक्के होईल. या समीकरणामुळे दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचेल.
  • भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया 2 सामने जिंकल्यास विजयी टक्केवारी 56.9 टक्के होईल. अशात भारताच्या आशा संपुष्टात येतील. पण गणित जर तर वर अवलंबून असेल.
  • ऑस्ट्रेलियाला 3 सामन्यात पराभवाची धूळ चारल्यास विजयी टक्केवारी 62.5 टक्के होईल. पण हे गणित दक्षिण आफ्रिकेच्या पुढच्या गणितावर अवलंबून आहे.
  • भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 4-0 मात दिल्यास विजयी टक्केवारी 68.1 टक्के होईल. असं झाल्यास भारत अंतिम फेरीत पोहोचेल.

बातमी वाचा- FIFA World Cup 2022 स्पर्धा जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी नेट कापली, कारण...

पहिल्या वर्ल्डकप टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला न्यूझीलंडनं पराभूत केलं होतं. 2021 मध्ये झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने सर्वबाद 217 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडने सर्वबाद 249 धावा केल्या. न्यूझीलंडकडे 32 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारताला 170 धावा केल्या आणि 138 धावांचं आव्हानं दिलं. न्यूझीलंडने हे आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं.