विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा इंग्लंड दौऱ्यावर जाणार?

टीम इंडियाचे क्रिकेटपटू 3 जून रोजी लंडनला पोहोचणार आहेत. तेथून टीम साऊथॅम्प्टनला जाणार आहेत.

Updated: Jun 1, 2021, 05:03 PM IST
विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा इंग्लंड दौऱ्यावर जाणार?

मुंबई: टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्याला निघण्याची तयारी करत आहेत. 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी जाणार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध हा अंतिम सामना ड्युक बॉलनं खेळण्यात येणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका देखील खेळवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट येत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना त्यांच्या पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला आपल्यासोबत इंग्लंड दौऱ्यावर घेऊन जाण्याची परवानगी मिळाली आहे. 

भारतीय क्रिकेटपटूंबरोबरच त्यांची पत्नी देखील इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकणार आहे. भारत विरुद्ध  इंग्लंड 4 ऑगस्टपासून इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळायचा आहे. टीम इंडिया सुमारे चार महिने दौर्‍यावर असणार आहे. त्यामुळे आता विराटसोबत अनुष्का आणि वामिका देखील इंग्लंड दौऱ्यावर असणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. 

टीम इंडियाचे क्रिकेटपटू 3 जून रोजी लंडनला पोहोचणार आहेत. तेथून टीम साऊथॅम्प्टनला जाईल आणि क्वारंटाइन होईल. टीम इंडियाच्या खेळाडूंना किती दिवस क्वारंटाइन ठेवण्यात येईल याबाबत सध्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही. सध्या टीम इंडिया मुंबईत आहे. सर्व खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.