Shubman Gill on WTC Final : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फायनल सामन्यात भारताला 209 धावांनी पराभूत करुन तब्बल दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. तर भारताचे पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा स्वप्न भंगलं आहे. या पराभवानंतर क्रिकेट प्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान भारतीय संघाचे खेळाडू विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली आणि शुभमन गिलच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
लंडनमधील ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (wtc final 2023) अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे सुरुवातीपासूनच वर्चस्व राहिले होते. सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 जून रोजी भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.यानंतर मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानावर फलंदाजी करत एकूण 469 धावा केल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतके ठोकली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने 4 विकेट घेतल्या.
टीम इंडियाच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 269 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावा केल्या आणि शार्दुल ठाकूरने 51 धावा करत अर्धशतक झळकावले. टीम इंडियाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला संघासाठी चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3 बळी घेतले.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करत 270 धावा केल्या. तर टीम इंडियाला दुसऱ्या डावातही फलंदाजी करण्यात अपयश आले. टीम इंडियाने केवळ 234 धावा केल्या. 209 धावांनंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आणि दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकली. यासह टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली. याआधी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्येही टीम इंडियाला उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता.याचपराभवानंतर भारतीय संघाचे खेळाडू विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने ट्विट करून निराशा व्यक्त केली आहे. शुभमन गिलने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, Not finished...असं म्हणत शुभमन गिलने टीमसोबत राष्ट्रगीत गातानाचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
Not finished pic.twitter.com/WSGwkkaH6v
— Shubman Gill (@ShubmanGill) June 11, 2023
या भारतीय खेळाडूंची सोशल मीडियावर पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. तर भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाला.