मुंबई : WWE चा सिकंदर म्हणजे रोमन रेंसने रिंग सोडली आहे. WWW Universal Champion असलेला रोमन रेंस एका गंभीर आजाराशी दोन हात करत आहे. आणि यामुळेच त्याला WWE ची रिंग सोडावी लागली आहे. रोमन रेंसचा ल्यूकीमियासारखा गंभीर आजार झाला आहे. ल्यूकीमिया हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे.
यामध्ये ब्लड सेल्स खूप वाढतात. ल्यूकीमिया झाल्यावर व्हाइट ब्लड सेल्स DNA मध्ये अडथळे निर्माण करतात. रोमन रेंसने खुलासा केला आहे की, 11 वर्षाचा असताना त्याला हा आजार झाला होता. पण आता या आजाराने पुन्हा डोकं वर केलं आहे.
EXCLUSIVE: Moments after announcing that his returning leukemia has forced him to relinquish the Universal Championship, @WWERomanReigns is met with an outpouring of support backstage. #Raw pic.twitter.com/JRv0iYLILJ
— WWE (@WWE) October 23, 2018
रोमन रेंसच्या या निर्णयामुळे वर्ल्ड रेसलिंग इंटरटेंमेंटमधील सर्वजण हैराण झाले आहेत. या सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे. कारण रोमन हा WWE मधील सुपरस्टार आहे. रोमनने आतापर्यंत अनेक दिग्गज रेसलरला हरवलं आहे. WWE Universal Champion देखील रोमन राहिला आहे. रोमनचे चाहते देखील या बातमीने खूप दुःखी झाले आहेत.
ल्यूकीमिया या आजाराचा धोका वयाच्या 55 वर्षानंतर उद्भवतो. रोमन रेंसला झालेल्या आजारावर उपचार संभव आहे. रोमनला योग्य उपचार मिळाले तर तो लवकरच बरा होईल आणि पुन्हा एकदा रिंगमध्ये वापसी करेल. ल्यूकीमिया या आजारामुळे सतत थकवा जाणवतो. ताप येत राहतो आणि वजन खूप लवकरच कमी होतं. सांध्यांमध्ये दुखापत जाणवते आणि त्वचेचा रंग बदलतो.