'या' फोटोतील स्टार क्रिकेटर्सना ओळखून दाखवा?

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला, तुम्ही 'या' स्टार खेळाडूंना ओळखलंत का?  

Updated: Nov 17, 2022, 09:43 PM IST
'या' फोटोतील स्टार क्रिकेटर्सना ओळखून दाखवा?   title=

Guess Who : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो व्हायरल (Photo Viral) होत असतात. या व्हायरल फोटोत काही फोटो हे तुमच्या आवडत्या कलाकार अथवा खेळाडूंचे असतात. हे आवडते कलाकार अथवा खेळाडू लहाणपणी कसे दिसतात? त्यांचे शिक्षण कुठून झाले आहे? त्यांचे आवडते ठिकाण कोणते आहे? अशा सर्व गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. य़ा फोटोतील खेळाडूंना तुम्हाला ओळखायचे आहे. 

फोटोत काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत (Photo Viral) दोन लहान मुले दिसत आहेत.या दोन्ही खेळाडूंनी सफेद कलरची जर्सी घातलेली दिसत आहे. त्यांच्या मागे मस्जिद असल्याचे दिसत आहे. दोघांची जर्सी पाहून दोघेही क्रिकेटर्स वाटत आहेत. 

दरम्यान या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सचिन, सेहवाग सारख्या दिग्गज खेळाडूंसोबत मैदानातही खेळले आहेत. पठाण ब्रदर्स म्हणून या खेळाडूंना क्रिकेटमध्ये ओळखले जाते. दोघांनीही टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. 

तुम्ही अजूनही या खेळाडूंना ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण आणि इरफान पठाणचा फोटो आहे. युसूफ पठाणचा आज वाढदिवस आहे, तो 40 वर्षांचा झाला आहे. त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (bcci) युसूफ पठाणला (Yusuf Pathan) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा धाकटा भाऊ आणि स्टार अष्टपैलू इरफान पठाणसोबतचा दोघांचा बालपणीचा फोटोही शेअर केला आहे. त्यानंतर हा फोटो व्हायरल होत आहे.