नवी दिल्ली : सध्या सगळीकडे ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बॅटींगचीच चर्चा आहे. रोहितने फार मेहनतीने हे यश मिळवलं आहे. नुकताच रोहितने एक हैराण करून सोडणारा किस्सा शेअर केलाय.
एका टॉक शोमध्ये रोहितने सांगितले की, २००७ मध्ये जेव्हा तो टीम इंडियासोबत आपला पहिला परदेश दौरा करत होता. तेव्हा संपूर्ण टीममध्ये एक असाही खेळाडू होता जो रोहितसोबत बोललाच नाही.
रोहितने ज्या खेळाडूचा संदर्भ दिला तो खेळाडू म्हणजे दुसरा तिसरा कुणी नाही तर युवराज सिंह होता. रोहितने सांगितले की, ‘तो टीम इंडियासोबत माझा पहिला परदेश दौरा होता. मोठ्या खेळाडूंमध्ये मी बराच नर्व्हस होतो. आम्हाला इतर खेळाडूंसोबत टीमची बस पकडायची होती. त्यामुळे मी एक तास आधीच लॉबीमध्ये पोहोचलो होतो. बस आली आम्ही सगळे त्यात बसलो, मी एका सीटवर बसलो. तेव्हा युवी आला आणि त्याने मला विचारले की, तुला माहिती आहे या सीटवर कोण बसतं? इथे मी बसतो. तू दुस-या सीटवर बस.
रोहित म्हणाला की, हा माझा युवराजसोबतचा अनुभव होता, जो अजिबात चांगला नव्हता. त्यानंतर संपूर्ण दौ-यात तो बोलला नाही. युवराज जेव्हा मॅन ऑफ द सीरिज ठरला तेव्हा मी त्याला शुभेच्छा दिल्या. पण त्याने केवळ धन्यवाद म्हटले.
युवराज सिंहने जेव्हा एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला तेव्हा तो माझ्याजवळ आला. त्यानंतर आम्ही दोघे बाहेर जेवायला गेलो. यावेळी यावेळी रोहित आणि युवराज यांच्यात चांगली मैत्री झालेली होती.