जेव्हा युवराजने रोहितला दिली होती आपल्या बहिणीपासून दूर राहण्याची धमकी!

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा जितका आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो तितकाच तो आपल्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. मोहालीमध्ये वनडे करिअरचं तिसरं दुहेरी शतक लगावल्यावर या चर्चांना अधिकच उधाण आलं. 

Updated: Dec 25, 2017, 03:21 PM IST
जेव्हा युवराजने रोहितला दिली होती आपल्या बहिणीपासून दूर राहण्याची धमकी! title=

मुंबई : टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा जितका आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो तितकाच तो आपल्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. मोहालीमध्ये वनडे करिअरचं तिसरं दुहेरी शतक लगावल्यावर या चर्चांना अधिकच उधाण आलं. 

रोहितचा तो धमाका

१३ डिसेंबर हा रोहित शर्माच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी रोहितने हा कारनामा करत पत्नीला लग्नाचं खास गिफ्ट दिलं. हा सामना त्याची पत्नी ऋतिका सजदेह मैदानात बसून बघत होती. रोहितने तिसरं दुहेरी शतक लगावलं आणि तिच्या डोळे पाणावले. तेव्हापासून रोहित आणि ऋतिकाची लव्हस्टोरी मीडियात चर्चीली जात आहे. रोहितने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या लव्हस्टोरीबद्दल काही खास रोमांचक खुलासे केले आहेत. 

युवराजने दिली ‘धमकी’

या मुलाखती दरम्यान त्याची पत्नीही सोबत होती. रोहितने सांगितले की, एका शूटदरम्यान तो टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना भेटण्यासाठी गेला होता. तिथे युवराज सिंह आणि ऋतिका उपस्थित होते. रोहितने सांगितले की, युवराजने मला बोलण्याआधीच थांबवले. आणि म्हणाला की, हिच्याकडे बघायचं सुद्धा नाही, ती माझी बहिण आहे. त्यानंतर मी संपूर्ण शूट होईपर्यंत ऋतिकाला रागातच पाहिलं. 

ते शूट पूर्ण झाल्यावर दिग्दर्शकाने रोहितला सांगितलं की, सर तुमचा माईक ऑन नव्हता. त्यामुळे तुम्हाला डायलॉग्स पुन्हा बोलावे लागतील. त्यानंतर ऋतिका रोहितजवळ गेली आणि तिने त्याला प्रेमाने विचारले की, काही मदत हवी असेल तर मला सांग.

हीच होती पहिली भेट

रोहितने सांगितली की, आमच्यात हे पहिलं बोलणं होतं आणि त्यानंतर आम्ही खूप चांगली मित्र झालो. त्यानंतर ऋतिका माझी मॅनेजर झाली आणि नंतर १३ डिसेंबर २०१५ ला आम्ही लग्न केलं. 

युवराज आणि ऋतिकाचं नातं

युवराज सिंह आणि ऋतिका सजदेह हे काही खरे बहिणी भाऊ नाहीत. ऋतिका ही युवराज सिंहची मानलेली बहिण आहे.  ऋतिका युवराजला राखी बांधते. ऋतिका ही अनेक टीम इंडियातील अनेक खेळाडूंची मॅनेजर आहे. त्यात रोहितचाही समावेश आहे.